पिंपरी-चिंचवड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

CD

पिंपरी, ता. ५ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे सोमवारी (ता. ५) विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहिमेत खासगी कंपन्यांसह सामाजिक संस्था, संघटनांकडूनही प्रतिसाद मिळाला.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण केले. बर्ड व्हॅली उद्यानासमोर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी वृक्षारोपण केले. उद्यान विभाग उपायुक्त रविकिरण घोडके, सहायक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड, दिव्यांग प्रतिनिधी प्रकाश कुटे, सुनील सूर्यवंशी, संजय पारधी आदी उपस्थित होते. रावेत म्हस्के वस्ती येथील वृक्षारोपण कार्यक्रमास ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित उपस्थित होते. ‘क’ क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या उपस्थितीत टेल्को मटेरियल गेट क्रांती चौकातील वृक्षारोपण झाले. औंध-रावेत बीआरटी मार्गावरील दुभाजकांतही वृक्षारोपण केले. सहायक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, सहायक हॉर्टिकल्चर सुपरवायझर गोपाळ खैरे उपस्थित होते. वडमुखवाडी जलतरण तलाव परिसरातील वृक्षारोपणप्रसंगी ई क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, उद्यान निरीक्षक दत्तात्रय आढळे व सहायक हॉर्टिकल्चर सुपरवायझर भानुदास तापकीर उपस्थित होते. थेरगाव बोट क्लब, एमआयडीसीतील पर्यावरण संस्कार केंद्र आदी ठिकाणीही वृक्षारोपण केले.
भोसरी येथील वंडर कार्सच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भोसरी-निगडी टेल्को रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. वरिष्ठ संपर्क व्यवस्थापक धनंजय माने, संपर्क व्यवस्थापक प्रवीण कांबळे, संजय पानवळकर, पुष्कर सोनवणे, नंदू चव्हाण, सुनील पहिलवान आदींनी सहभाग घेतला. महापालिका जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT