पिंपरी-चिंचवड

नुथॉन २०२३ स्पर्धेत करण जामदार विजेता

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ६ : नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील एनसीईआर महाविद्यालयात आयोजित ‘नुथॉन २०२३’ स्पर्धेत करण जामदारने विजेतेपद पटकावले. तर तेजस दोंड उपविजेता ठरला. ‘प्लास्टिक मुक्तीतून पर्यावरणाकडे’ हा जनजागर करण्यासाठी या स्पर्धेत एकूण १४४ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय सेवा योजना आणि मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्‍घाटन प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे यांनी केले.
या वेळी डॉ. विकास यादव, प्रा. भीमराव गायकवाड, प्रा. भूषण पवार, डॉ. एम. के. बिरादार, प्रा. किशोर खैरनार, डॉ. दिग्विजय पाटील, प्रा. विजय दराडे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. दरम्यान, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ‘ओला-सुका कचरा विभाजन व विल्हेवाट’ याविषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

PNE23T47565

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT