पिंपरी-चिंचवड

साडेचार हजार ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील प्रकार

CD

पिंपरी, ता. ७ : ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील गृह प्रकल्पाच्या लाभार्थ्यांनी ४ हजार ५०० वीजमीटरसाठी महावितरणच्या भोसरी शाखेकडे मागणी केली. मात्र, कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे ‘कोटेशन’ काढण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, शाखा कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक तथा विद्युत संनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली. यासंदर्भात सौंदणकर यांनी पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे, की ‘पीएमआरडीए’ने पेठ क्रमांक १२ येथे आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृह प्रकल्प विकसित केला आहे. त्यातील लाभार्थ्यांनी ४ हजार ५०० वीजमीटरसाठी भोसरी शाखा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. एवढ्या लाभार्थ्यांना एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मीटर उपलब्ध करून देणे शक्‍य नाही. नागरिकांना वेळेत मीटर देण्यासाठी महावितरणकडून भोसरी शाखा कार्यालयात अतिरिक्त तीन ते चार कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरुन मीटरसाठी येणाऱ्या नागरिकांना कोटेशन काढून देणे, विद्युत विषयक कामकाज करणे सोयीचे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी मोठी वाढ; आता एक लिटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

RCB vs CSK: दिनेश कार्तिकने खरंच अंपायरला पाटिदारचं ड्रिंक पिण्यावरून झापलं? समोर आलंय वेगळंच कारण; Video Viral

Marathi Folk Artist Death : लोककलेचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन; औरंगजेबाची 'ती' भूमिका ठरली होती अजरामर

Arjun Tendulkar कसा आहे? साराने चार शब्दांत जगासमोर जाहीर केले… आता सोशल मीडियावर नवीन चर्चा...

'त्या' व्हायरल MMS नंतर शाहिद-करिनामध्ये आला होता दुरावा, पार्टीतील किसिंगमुळे...

SCROLL FOR NEXT