पिंपरी-चिंचवड

विद्येच्या प्रांगणात

CD

सदर - शालेय जगत


बालदिनात ‘ऑनलाइन’ धम्माल
बाल दिन म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस ! मात्र, यावर्षी दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक शाळांमध्ये ‘चिल्ड्रेन्स डे’ साजरा झाला नाही. याला अपवाद ठरले ते म्हणजे भोसरीतील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसव्हीएसपीएम) भोसरी येथील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतिवर्षी बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवाळीच्या सुट्टी सुरू होत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये धम्माल करता येणार नाही. हे लक्षात घेऊन स्कूल प्रशासनाने ऑनलाइन बाल दिवस’ साजरा करण्याचा नवा फंडा नियोजित केला. त्याला विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘दिवाळी मेला’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पणत्या बनवल्या. या उपक्रमातून प्रोत्साहन घेऊन त्यांनी स्वत: पणत्या आणल्या आणि सुशोभित करुन आपल्या नातेवाईकांना भेट दिल्या. तसेच विविध ॲक्टिव्हिटी सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे, यावर्षीचा बालदिवसही संस्मरणीय झाला. यासाठी उपमुख्याध्यापिका प्रिया नेवाळे व श्रुती जोशी यांनी यांनी पुढाकार घेतला. पूर्व प्राथमिक विभागाच्या वृषाली आहिरे व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर मुखवटे करुन मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. शाळेतील सर्व विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे, विश्वस्त सरिता विखे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
-PNE23T85416

विद्यार्थ्यांची विनामूल्य नेत्रतपासणी
निगडी प्राधिकरण-सिंधूनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बजाज अलियांझ, स्प्रिंग व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने, शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर, उपप्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षिका सुरेखा वाळुंज, स्प्रिंग व्हिजनचे सदस्य राम पोल, संदीप थोरात , विशाल तायडे उपस्थित होते. यावेळी यावेळी १२९८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी १४५ विद्यार्थ्यांची चष्मा देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. ६१ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चष्म्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी संचलनासाठी मंगेश रेडकर, दिलीप पानसरे, संजय जगताप यांनी विशेष मेहनत घेतली.
PNE23T85415

संविधान दिन साजरा
सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ट महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन करून प्रतिज्ञा घेतली. एस.एस. धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व, हक्क, कर्तव्ये व त्यांची पार्श्‍वभूमी सांगितली. यावेळी जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव राजेंद्र मुथा, सहसचिव अनिल कांकरिया, प्राचार्या सारंगा भारती, उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, पर्यवेक्षक डी.एस.थोरात, शिक्षक प्रतिनिधी एस.डी देशमुख, आर.एस. कोटस्थाने व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
PNE23T84830

‘युथ आयडियाथॉन’मधील रुपेरी चमक
मोशी येथील सिटी प्राईड स्कूलने ‘युथ आयडियाथॉन २०२३’ या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्यपदके पटकावली. ‘युथ आयडियाथॉन’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठी नवोपक्रम आणि उद्योजकता स्पर्धा आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट नाविन्याला प्रोत्साहन देणे आणि शालेय मुलांमध्ये मोठा विचार करण्याची आणि भविष्यातील कल्पनांची स्वप्ने पाहण्याच्या प्रचंड क्षमतेचा उपयोग करणे हा आहे. यावर्षी या चारस्तरीय स्पर्धेत देशभरातील ६००० शाळांमधील ५०,००० संघांनी आणि १,५५,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. द्वितीय फेरीमध्ये १०००
संघ निवडले गेले आणि त्यामधून तृतीय फेरीमध्ये फक्त ५० संघांची निवड करण्यात आली. तृतीय फेरीत काठिण्य पातळी असलेल्या मुलाखतीद्वारे प्रथम १० संघांची निवड करण्यात आली. आयआयटी दिल्ली येथे झालेल्या अंतिम फेरीत स्पर्धेत उच्च श्रेणीतील उद्योजकांच्या निर्णायक समितीसमोर त्यांची कल्पना मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. राज्यातील सिटी प्राईड स्कूल, मोशी संघाने त्यांच्या ‘इको-गार्डियन्स’ प्रकल्पासह प्रथम १० मध्ये आपले स्थान पटकाविले. यामध्ये इयत्ता सातवीच्या प्रथमेश स्वामी, प्रसीद अरकेरी आणि कुश सक्सेना या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना भावेश अहिरे, प्रणिता पवार, शायनी
कोशी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ‘ऑटोमोबाईल कार वॉश वॉटर रियुटिलायझेशन’ हे या प्रकल्पाचे शीर्षक होते. आयआयटी दिल्लीच्या डोगरा हॉलमध्ये झालेल्या समारंभात रौप्यपदक मिळाले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर झळकणे हा शाळेसाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे.
23T85414

‘सुपर अचिव्हर्स’चे धवल यश
निगडीतील सिटी प्राईड स्कूलच्या ‘सुपर अचिव्हर्स’च्या सत्कार करण्यात आला. यात एकूण १५० सुवर्णपदके आणि ३३ रौप्यपदके विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. सीबीएसई बोर्ड टॉपर्स, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविलेल्या सर्व प्रकल्पातील सहभागी विद्यार्थी व सर्व शाखांमधील मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासनाधिकारी संजय नाईकडे, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक डॉ. साजिद अल्वी यांच्यासह निगडी, मोशी आणि रावेत शाखेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी सिटी प्राईड स्कूलच्या संचालिका डॉ.अश्विनी कुलकर्णी, डॉ.दीपाली सवाई यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापकीय समिती व त्यांच्या मार्गदर्शनाचे पाहुण्यांनी खूप कौतुक केले. समन्वयक मृणालिनी घोलप, मुख्याध्यापिका माया सावंत, मुख्याध्यापिका सुजा राजेश, मुख्याध्यापिका सुमेधा फडके यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका निशा पणिकर यांनी केले. तर लीना जाधव यांनी आभार मानले. सुवर्णा सहस्रबुद्धे आणि शीतल चिन्ननवार यांनी संयोजन केले.
23T85413

संवाद व नेतृत्व कौशल्य निर्मिती
विद्यार्थ्यांमध्ये लहानवयापासूनच संवाद व नेतृत्व कौशल्ये निर्माण करण्यासाठी थेरगाव येथील द अकॅडमी स्कूलने एका विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले पोर्टफोलिओ तयार करून,पालक व शिक्षकांसमोर आपली वार्षिक कामगिरी सादर केली. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला होता, अशी माहिती द अकॅडमी स्कूलच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे यांनी दिली.
डॉ.मैथिली तांबे पुढे म्हणाल्या की, ‘‘हा उपक्रम विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कौशल्ये प्राप्त करण्यास मदत करेल. त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात याची नक्कीच मदत होईल. तसेच या उपक्रमाद्वारे भविष्यात रोजगार मिळवण्यासाठीही विद्यार्थी अनेक गोष्टी शिकू शकतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT