पिंपरी-चिंचवड

समता सैनिक दलातर्फे ‘वॉक फॉर संविधान’

CD

पिंपरी, ता. २८ : समता सैनिक दलाच्या वतीने संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी ‘छत्रपती ते घटनापती’ अशी पदयात्रा काढण्यात आली. संविधानाच्या जयघोषाने शहर दुमदुमले होते.
या पदयात्रेचा मुख्य उद्देश भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, शाई ते लोकशाही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. त्याची सुरुवात दापोडी येथून करण्यात आली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात आपल्या मूलभूत अधिकाराची माहित असलेले तब्बल एक लाख पत्रक घरोघरी पोहोचवण्यात आले. पदयात्रेत विविध सामाजिक संघटना, पक्ष, मंडळे तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक चौकात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून ही पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा अनुक्रमे शहरातील दापोडी, कासारवाडी, लांडेवाडी, पिंपरी, आनंदनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, मोहननगर, प्राधिकरण, आकुर्डी, गांधीनगर, खराळवाडी, नाणेकर चाळ, वैशालीनगर, पत्रा शेड, रमाबाईनगर, बोपखेल आदी भागातून काढण्यात आली.
या वेळी पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत भारतीय सैन्याची तुकडी, महार बटालियनच्या यश-सिद्धी आजी-माजी सैनिक, बहुउद्देशीय वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र राज्य माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. या पदयात्रेचे आयोजन समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गरबडे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT