पिंपरी-चिंचवड

‘सुपर स्मार्ट’ उद्योगनगरी

CD

‘सुपर स्मार्ट’ उद्योगनगरी

शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवले. पिंपरी-चिंचवड शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनवले. शहरातील लोकप्रतिनिधी, कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची औद्योगिक पिंपरी-चिंचवड नगरी घडली आहे. या शहराला त्यांनी स्मार्ट सिटी बनविले आहे. खरे तर पिंपरी-चिंचवड हे एक गतिमान शहर आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

पिं परी-चिंचवड हे उद्योगांचे नगर म्हणून नावारूपास आले असले तरी हे केवळ उद्योगनगर नसून महान संतश्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी, क्रांतिवीर चापेकर यांची जन्मभूमी असलेले हे नगर, महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान म्हणून नावारूपास आलेले शहर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला लाभलेली आहे. पुण्याचे जुळे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या चार दशकांपासून टेल्को, बजाज, महिंद्रा, एसकेएफ, टीसीएस अशा अनेक कंपन्यांची भर पडल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी-चिंचवडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील देशाच्या आर्थिक प्रगतीत पिंपरी-चिंचवड शहराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरे सांगायचे तर, पिंपरी-चिंचवड हे एक गतिमान शहर आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याची अफाट क्षमता शहरात आहे. महापालिकाही कटिबद्ध जनहिताय’ हे ब्रीद घेऊन पिंपरी-चिंचवडला भारतातील सर्वात स्वच्छ व हरित शहर बनवून जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त करण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे.
शहर विकासासाठी पर्यावरण समतोल आणि नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे, स्मार्ट पायाभूत सुविधा, कार्यक्षम वाहतूक, सुलभ नागरी सुविधांना प्रोत्साहन देणाऱ्या नावीन्यपूर्ण शहरी नियोजन धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. शहराचे विस्तारीकरण लक्षात घेता पायाभूत सुविधांचा विचार करून पुढील ५० वर्षाचे अचूक नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिकेचा आराखडा तयार करण्यावर भर असेल. लोकप्रतिनिधी, लोक भावनांचा विचार केला जाईल. येणाऱ्या पिढीचा शहरात श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घेऊन लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक, उद्योजक, विकसक, कष्टकरी यांचा देखील विचार केला जाईल. दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. क्रीडा क्षेत्रातही पिंपरी-चिंचवड भरीव कामगिरी करीत आहे. नागरिकांच्या सहभागातून आणि पारदर्शक कारभारातून सामाजिक बांधिलकीची भावना मजबूत करून शहराच्या विकासात नागरिकांना भागीदार बनवणे हे आमचे ध्येय आहे. नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा उपयोगकरत राहू. पर्यावरणास अनुकूल असलेल्या पद्धती स्वीकारून भविष्यातील शहर हे तंत्रज्ञानाची कास धरणारे, कार्यक्षम सेवा देणारे, डेटा आधारित काम करणारे आणि शहराचा विकासाचा आलेख उंचावणारे असेल. महिला बचत गटांच्या माध्यमातून सक्षमपणे व्यवसाय आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्याकडे आम्ही भर दिला असून, विविध योजनांची आखणी त्यासाठी केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. समाजातील सर्व घटकांचे सक्षमीकरण करणे हा यामागचा उद्देश आहे. एक प्रशासक या नात्याने भविष्यातील पिंपरी-चिंचवड शहर हे एक गतिमान, शाश्वत आणि भरभराटीचे शहरी केंद्र होईल.

शहराचे उज्ज्वल भविष्य
उद्योग आणि संधीचे केंद्र म्हणून ‘उद्योगनगरी’कडे पाहिले जाते. उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी कुशल कर्मचारी वर्ग, गुंतवणूकदारांसाठी हे शहर अनुकूल आहे. येथे असलेले वैविध्यपूर्ण औद्योगिक क्षेत्र, भरभराट होत असलेले उत्पादन क्षेत्र, आर्थिक स्थिरता व त्याच्या वाढीसाठी मजबूत पाया पिंपरी-चिंचवडने रोवला आहे. चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण एमआयडीसीचा काही भाग जोडून जवळपास सात हजारांहून अधिक छोटे-मोठ्या उद्योगांकडून उत्पादन निर्मिती आणि सेवा देण्याचे काम या औद्योगिक परिसरात
सुरू आहे. शहराची प्रगती निरंतर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मूलभूत नागरी सुविधांवर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. मेट्रो रेल्वे, रस्ते वाहतूक, बीआरटीएस मार्गांचे जाळे पसरवून शहराच्या टोकांना जोडण्याचे काम करण्यात आले आहे. तरुणांना सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांच्या रोजगारासाठी पायाभूत सुविधा, अचूक शहरी नियोजन आणि कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका सक्षमपणे आपली भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मिती तसेच तरुणांचे स्वप्न बहरण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच पुढाकार घेत आहे. यातून शहर आणि संपूर्ण राष्ट्र या दोघांचेही उज्ज्वल भविष्य घडेल, असे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून शहर विकासाचे लक्ष्य गाठण्याचा आमचा मानस आहे.

आरोग्य व वैद्यकीय सुविधा
महापालिका नेहमीच नागरिक केंद्री उपक्रम राबविण्यावर भर देते. महापालिकेचे स्वत:च्या मालकीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. वैद्यकीय सेवेचे आधुनिकीकरण करून वायसीएम रुग्णालयासह मेडीकल कॉलेज, थेरगाव कॅन्सर हॉस्पिटल, शंभर बेडचे नवीन भोसरी रुग्णालय, १२० बेडचे सुसज्ज जिजामाता रुग्णालय, आकुर्डी येथील १३० बेडचे कै. प्रभाकर कुटे रुग्णालय, जिजाऊ क्लिनिक, मासुळकर कॉलनी येथील समर्पित नेत्र रुग्णालय, डायलिसिस केंद्र यासह ओपीडीमार्फत २४ बाय ७ अशी आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सक्षमपणे उभे आहोत. स्त्री-रोग विभाग, मानसोपचार, त्वचारोग, क्षयरोग विभाग, रेडिओलॉजी, मेडिसीन, पॅथॉलॉजी लॅब यासारख्या सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध असून, तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. महापालिका रुग्णालयांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत असून, विविध आजारांच्या उपचारांसाठी निरंतरपणे अद्ययावत सुविधा करण्याचा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. नागरिकांना घराजवळ प्राथमिक उपचार मिळावेत, या उद्देशाने २५ ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करून कुठल्याही गंभीर आजाराचे निदान व उपचार होण्यासाठी २४ बाय ७ महापालिका रुग्णालये कटिबद्ध आहेत.

शिक्षणात अग्रेसर
शाळांच्या सक्षमीकरणासाठी इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण, जल्लोष शिक्षणाचा, सामान्यज्ञान स्पर्धा, केंद्र भेटी, हस्ताक्षर स्पर्धा, अद्ययावत खेळांचे प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचे धोरण आखण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया, डोअर स्टेप इत्यादी संस्था गुणवत्ता वाढीसाठी काम करीत आहेत. याचाच परिपाक म्हणून बोपखेल शाळा व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सूरू असलेली इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या दहा शाळांच्या क्रमांकांमध्ये समाविष्ट असणारी भारतातील एकमेव शाळा नावारूपाला आली आहे. सीबीएससी इंग्रजी बारावीपर्यंतचे शिक्षण व सोबत महाराष्ट्रातील विविध संतांच्या विचारांचा अभ्यासक्रम असणारा अत्याधुनिक ज्ञान व भक्ती, संस्कार देण्यासाठीचा टाळगाव चिखली येथील ‘संतपीठ’ हा एक अभिनव उपक्रम महापालिका राबवीत आहे.

पर्यावरणावर भर
पर्यावरण संतुलन व शाश्वत विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘ग्रीन बिल्डिंग’ या सारख्या उपक्रमांना चालना देण्याचे काम सुरू आहे. शहर आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल ठेवण्यासाठी हा प्रयोग राबविला जात आहे. शहरातील वायू प्रदूषण, इंधन वापराचे प्रमाण कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पूरक असणाऱ्या ध्येय-धोरणांना चालना देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील ईव्ही इकोसिस्टम सुधारण्यासाठी ईव्ही रेडिनेस आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये ईव्ही चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन विकसित करणे, ईव्ही घटकांचे उत्पादन आणि सार्वजनिक वाहतूक विद्युतीकरण यासारख्या सुविधांचा समावेश आहे. २०२६ पर्यंत शहरात १,८०,००० ईव्ही वाहनांचा वापर तसेच तीन चाकी प्रवासी वाहनांमध्ये किमान ५० टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत, यासाठी महापालिकेने लक्ष्य केंद्रित केले आहे. सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर तसेच इलेक्ट्रिक ऑटोरिक्षांचा अवलंब होण्यासाठी समस्यांवर तोडगा काढला जात आहे. शहरात दररोज १२०० टन पेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यातून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असतो. यामुळे हवा प्रदूषित होण्याची शक्यता जास्त संभवते. मात्र, महापालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाने कचरा डेपोवर बायोमायनिंग आणि कॅपिंग केले आहे. त्यामुळे हवेचे मानांकन चांगले राहिले आहे. शहरात हरित सेतू, वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्टपासून बायोगॅस, वेस्ट टू कंपोस्ट, ईव्ही पॉलिसीसारखे महत्त्वाचे प्रकल्प महापालिकेने राबविले आहेत. यामुळे शहरातील हवामान उच्च दर्जाचे ठेवण्यात महापालिकेला यश आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सने ‘स्टेट ऑफ सिटीज’: टुवर्डस लो कार्बन अँड रेसिलियंट पाथवेज अहवालानुसार पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्र राज्यातील ४८ टक्के ग्रीन कव्हर असलेले एकमेव शहर ठरले आहे. हवामान स्मार्ट सिटी मूल्यांकन आराखडा २.० अंतर्गत हवामान अनुकुलीत ठेवून केलेल्या उत्तम कामगिरीसाठी महापालिकेला पाच पैकी चार स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. शहरातील हवामान अनुकूलनासाठी भविष्यातील आव्हाने आणि त्यासाठीच्या उपाययोजना तसेच अभियांत्रिकी, वाहन उद्योग, औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान उद्योगांचा समावेश असलेल्या औद्योगिक क्षेत्रांनी हवामान लवचिकता कृती आराखडा प्रभावीपणे तयार करून त्याचा अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. ‘ग्रीन स्कूल-झिरो वेस्ट’, सोसायटीत कंपोस्टिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प इ. उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या मुख्य अनुकूलन उपायांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, जल व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, शहरी जैवविविधता, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकाची स्थापना, इमारतींच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प, हरित इमारती, नदी सुधार प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर, एसटीपी प्लॅन्ट, वृक्षारोपण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग अशा प्रकल्पांमुळे भविष्यामध्ये हवामानात चांगले बदल दिसून येतील, हे नक्की.

नागरिकांशी संवाद
महापालिकेच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांशी संवाद प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. शहराच्या विस्तारामुळे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या तीन वर्षांत भामा-आसखेड धरणाच्या पाण्याची उपलब्धता पाणी नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. शहराच्या भविष्यातील पाण्याच्या गरजांसाठी उत्तम जलव्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी योगदान दिले जाईल. शहरात माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ महाराष्ट्र, अमृत, स्मार्ट सिटी, शून्य कचरा अभियान, स्वच्छ हवा अभियान हे महत्त्वाचे उपक्रम प्रगतिपथावर आहेत. अत्यावश्यक शहरी सेवा, गतिमानता आणि रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांसाठी गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय स्वच्छ हवा अभियान, प्रदूषण कमी करणाऱ्या आणि स्वच्छ हवेला प्रोत्साहन देणाऱ्या उपाय योजनांद्वारे हवेच्या गुणवत्तेची चिंता दूर होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) मदतीने तरुणांना उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अन्य सुविधा
क्रीडानगरी म्हणून शहराने स्वतःचे नाव निर्माण केले आहे. विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होण्यासाठी शहरात अद्ययावत क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. सायन्स पार्क, तारांगण अशा प्रकल्पांमुळे शहर विज्ञानाकडे झेप घेत आहे. शहरातील नागरिकांना ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ अॅपच्या साहाय्याने पाणी, वाहतूक, आपत्कालीन परिस्थिती या संबंधीची तातडीची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे महापालिकेशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’द्वारे तक्रार नोंदविता येते, तसेच महापालिकेची विविध देयके/ कर भरणा करता येतो. आवश्यक प्रमाणपत्र, दाखले इत्यादींची मागणी नोंदविणे सोपे झाले आहे. दैनंदिनी ५० हजारांहून अधिक नागरिक या ॲपचा वापर करून सुविधांचा लाभ घेत आहेत. गृहप्रकल्प, तृतीयपंथी समूहासाठी विविध उपक्रम, नवी दिशा उपक्रम, औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर), उद्योग कक्ष, कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये नावीन्यपूर्ण बदल, उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र, कै. अटल बिहारी वाजपेयी उद्यान, ८ टू. ८० पार्क, बर्ड व्हॅली, इको ट्रॅक, फूड कोर्ट विकसित करणे, ॲनिमल शेल्टर हाउस, ईव्ही वाहने व चार्जिंग स्टेशन्स, रुफटॉप सोलर पॉवर प्रोजेक्ट, कर विभागाचे आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र, रोईंग प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, हॉर्स रायडिंग, धनुर्विद्या, बॅडमिंटन हॉल, कबड्डी प्रशिक्षण अकादमी, वेस्ट टू. बेस्ट या सारखे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प कार्यरत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT