पिंपरी-चिंचवड

देहूतील गायरान वाचविण्यासाठी बेमुदत उपोषण सुरु

CD

देहू, ता.२८ ः देहू नगरपंचायत हद्दीतील सरकारी गायरान वाचविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (ता.२८) पासून देऊळवाड्याच्या महाद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
नगरपंचायतीच्या हद्दीत सर्व्हे.नंबर ९७ मध्ये सुमारे १५० एकर जागा शिल्लक आहे. या जागेपैकी ५० एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयास देण्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरु आहेत. मात्र, ही जागा देण्यास देहूतील ग्रामस्थ, संस्थान आणि काही नगरपंचायत सदस्यांचा विरोध आहे. भविष्यात सरकारी गायरान जागेवर नगरपंचायत कार्यालय, पालखी तळ, वाहनतळ, क्रीडांगण, भक्तनिवास, बगिचा व इतर नगरपंचायतचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे, भाविक आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेऊन पोलिस आयुक्त कार्यालयास जागा देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे.
सर्वांचा विरोध असूनही शासनाकडून पोलिस आयुक्तालयास जागा देण्यास हालचाली सुरु आहेत. तसेच देहू नागरिकांच्यावतीने जागा देऊ नये, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच दोनवेळा मोजणीस नागरिकांनी विरोध केला आहे.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, सदस्य योगेश परंडवाल, स्वप्नील काळोखे, योगेश काळोखे, प्रदीप परंडवाल, प्रवीण काळोखे, सदस्या स्मिता चव्हाण, प्रकाश हगवणे, अण्णा काळोखे व इतर उपोषणात सहभागी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसिलदार डॅा.अर्चना निकम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तसेच उपोषण सोडण्याची विनंती करून शासनाकडे म्हणणे मांडण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT