पिंपरी, ता. २८ ः ‘खोटं बोलून त्यांची झाली साखर तुमची झाली मळी, भूलथापांचे बळी हो तुम्ही भूलथापांचे बळी’ ही कविता सादर करून एका वाघाची शिकार एका हरणीने केली फेम डॉ. विनायक पवार यांनी नागरिकांमध्ये सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या नेत्यांपासून सावध राहण्याचे आणि योग्य त्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले.
संविधान दिनानिमित्ताने संविधानाची जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात आयोजित विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये ‘आवाज संविधानाचा’ हे कविसंमेलन झाले. त्यात, पवार यांच्यासह प्रा. प्रशांत मोरे, शमिभा पाटील, डॉ.स्वप्नील चौधरी, प्रवीणकुमार यांनी सहभाग घेतला.
मोरे यांनी ‘माय-मातीचा कायदा नाही लिहिला रातोराती, साऱ्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती’ ही कविता सादर करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अजरामर कार्याची आठवण करून दिली. पाटील यांनी ‘मिस्टर आंबेडकर तुम्ही जबरदस्त ग्रंथ लिहिलात’ ही कविता सादर केली. चौधरी यांनी कर्जबाजारी बापाच्या मुलाची व्यथा मांडणारी ‘गण्या’ नावाची कविता सादर करून उपस्थितांना भावुक केले. प्रवीणकुमार यांनी ‘संविधान आता जपा यार हो’ ही कविता सादर केली. रोहित शिंगे आणि काजल कोथळीकर यांनी निवेदन केले. त्यानंतर मंजूषा शिंदे, संजय गोळे आणि धीरज वानखेडे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. लोकगायक मिलिंद शिंदे यांच्या बहारदार आवाजाने आणि संविधानावर आधारित प्रबोधनपर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.