पिंपरी, ता. १४ ः पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. १३)निवडणूक झाली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत श्री स्वामी समर्थ पॅनलचे १७ पैकी ९ उमेदवार विजयी झाल्याने त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. निकाल जाहीर होताच विजयी पॅनेलने भंडारा उधळून विजयाचा जल्लोष केला.
महापालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेसाठी शुक्रवारी चिंचवड स्टेशन येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी नऊपासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत ८६४ शिक्षक मतदारांपैकी ८४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.०२ टक्के मतदान झाले. १५ शिक्षक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. यंदा संजय येणारे, संतोष उपाध्ये आणि मनोज मराठे या तीन शिक्षक नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. मोरया, श्री स्वामी समर्थ आणि शिक्षक समृद्धी अशी तिन्ही पॅनेलच्या शिक्षकांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. रजेवर जाऊन शिक्षकांनी जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनलचे नऊ, मोरया पॅनेलचे सहा आणि ‘शिक्षक समृद्धी’ पॅनेलचे केवळ दोन उमेदवार निवडून आले आहेत. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. जी. शृंगारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत, गजेंद्र सवाईकर, दिलीप मुळे, प्रवीण ढमाले यांनी कामकाज पाहिले.
असा लागला निकाल
एकूण जागा ः १७, सर्वसाधारण गट ः १२ जागा, विजयी उमेदवार आणि मिळालेली मते ः शिवाजी दौंडकर (४६१), हरिभाऊ साबळे (४२०), मनोज मराठे (४१३), संतोष गिड्डे (३६५), राजेंद्र कांगुडे (३६०), राजकुमार जराड (३५८), सुभाष सूर्यवंशी (३४६), संजय इंदलकर (३४४), रामदास लेंभे (३४३), गणेश लिंगडे (३४०), हनुमंत सुतार (३१५), प्रवीण गायकवाड (३१३).
महिला राखीव गट -२ ः सुरेखा मोरे (३७१), स्नेहल हिरणवाळे (३२९), इतर मागासवर्गीय गट -१ ः राजश्री रासकर (४८०), अनुसूचित जाती जमाती राखीव गट-१ ः घमेंद्र भांगे (६१३),भटक्या जमाती विमुक्त जाती राखीव गट -१ ः विनायक शिरतर (३७४)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.