पिंपरी-चिंचवड

पवना नदी प्रदूषण मुक्तीचा संकल्प

CD

पिंपरी, ता. २२ ः पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यायी व्यवस्था करण्याचा संकल्प, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्यांद्वारे दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश, नदी व जल संवर्धनासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांनी पवना जलदिंडीचा गुरुवारी (ता. २१) सायंकाळी चिंचवड येथील पवना नदी काठावरील जिजाऊ उद्यानात समारोप झाला.
जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पवनामाई जलदिंडीचे बुधवारी पवनानगर येथून प्रस्थान झाले होते. त्यापूर्वी लोहगड येथील कार्यक्रमात पवना धरणाची माहिती दिली होती. नदीचे पूजन करून जलदिंडी निघाली होती. शिवली, आर्ढव, थुगाव, शिवणे, बेबडओहोळ, साळुंब्रे येथे पहिल्या दिवसाचा प्रवास थांबवला होता. गुरुवारी साळुंब्रे येथून दिंडी मार्गस्थ झाली. ग्रामप्रबोधिनी विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर प्रवासाला प्रारंभ झाला. किवळे, रावेत, थेरगाव मार्गे येऊन चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी घाटावर दिंडीचा समारोप झाला. तेथील जिजाऊ उद्यानात ग्रामप्रबोधिनी व रावेत येथील एस. बी. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. पाणी बचतीसह नदी संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला. प्रशासकीय अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी व अभ्यासक शिरीष पांडव, प्रा. डॉ. संदीप माळी, ग्रामप्रबोधिनीचे व्यंकटेश भताने, डॉ. संजय लकडे, सुभाष देशपांडे, राजीव भावसान यांच्यासह ज्ञानप्रबोधिनी, मॉडर्न स्कूल, जेएसपीएम महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, एसएनबीपी महाविद्यालय आणि पीसीसीओई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

पुरस्काराने सन्मान
पर्यावरण व नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. संजय लकडे व डॉ. संदीप माळी यांना पिंपरी-चिंचवड पर्यावरण मित्र आणि सायन्स पार्कचे प्रवीण तुपे यांना पवनामाई जलमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

नदीतील पाणी शुद्ध ठेवणे अशक्य नाही
नदी काठच्या गावांतील महिला नदीतच कपडे धुतात. त्यामुळे साबण व डिटर्जंट पावडरमधील रासायनिक घटक नदीत मिसळत असून ती अधिक प्रदूषित होते. हे रोखण्यासाठी व नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गावागावांत जाऊन, नदीत कपडे धुऊ नका, त्यासाठी गावात जागा उपलब्ध करून दिली जाईल, ते पाणी झाडांना देऊन व जमिनीत इतरत्र जिरवा, अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून प्रारंभ करूया. अंघोळ व कपडे धुण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करण्याचा हट्ट धरूया, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही घरी डिटर्जंट पावडर व साबण वापरणे बंद केले आहे. नैसर्गिक साधनांचा त्यासाठी वापर करत आहोत.’’ धरणात शुद्ध पाणी आहे, तसेच पाणी रावेत बंधाऱ्यात दिसायला पाहिजे, यासाठी प्रयत्न करूया. हे काम अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

किती रुपयांत बुक करू शकता नवी कोरी Tata Tiago EV फेसलिफ्ट? जाणून घ्या बूकिंगची साधी सोपी प्रोसेस

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News नागपुरात पोलिसांवर हल्ला, कार अंगावर घालण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT