पिंपरी-चिंचवड

देहूत आरोग्य यंत्रणा सुसज्ज

CD

देहू ता. ८ ः आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा दहा जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्यास हजारो वारकरी सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने यंत्रणा तयारी ठेवली आहे. शहरात प्रमुख पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत. तसेच सात अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनाकडून मुबलक औषध साठा उपलब्ध आहे. तसेच सात वैद्यकीय अधिकारी आणि तीस आरोग्य कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध आहेत. जलजन्न आजार रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी २९ ठिकाणचे पाणी स्रोतांचे नमुने घेण्यात आले आहेत. विहिरी आणि विंधनविहिरींचे पाण्याची तपासणी केली आहे. भाविकांना काही भागात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या टॅंकरवर एक वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात येणार आहे. गावातील हॅाटेल चालकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठी मेडिक्लोअरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे. किटकजन्य आजार रोखण्यासाठी गावातील गटारांची स्वच्छता सुरू आहे. तसेच बीएचसी, धुराची फवारणी करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीतील पाणी स्वच्छ राहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे व्यवस्था
- यात्रा काळात पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग
- मुख्य मंदिर, गाथा मंदिर आणि वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रात चोवीस तास रुग्णांसाठी व्यवस्था
- सात वैद्यकीय अधिकारी, सहा आरोग्य सहाय्यक, तेरा आरोग्य सेवक, सात आरोग्य सेविका असे एकूण तीस कर्मचारी
- पंधरा प्रशिक्षणार्थी डॅाक्टर नियुक्त
- सात रुग्णवाहिका उपलब्ध
- साप, कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी लस उपलब्ध
- गावात पालखी मार्ग, वैकुंठ मार्ग, ग्रामपंचायत मार्ग, माळवाडी, विठ्ठलवाडी मार्गावर आरोग्यपथके तयार

चोवीस तास वीजपुरवठा
पावसाचे दिवस आणि वाढती गर्दीच्या पार्श्वभूमीवर वारीत वीजपुरवठा चोवीस तास ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने जोरदार तयारी केली आहे. वैकुंठस्थान, गाथा मंदिर, मुख्य देऊळवाडा परिसरातील ट्रान्सफॅार्मरची दुरुस्ती केली आहे. तसेच त्यांची क्षमतेत वाढ केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास पथक नेमण्यात आले आहे. वाकलेले विद्युत खांब दुरुस्त केलेले आहेत. विभागवार कर्मचारी नेमून कोणतीही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती देहूचे शाखा अभियंता विनोद वाघमारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT