पिंपरी-चिंचवड

आदिशक्तीच्या आगमनाची उत्सकता

CD

पिंपरी, ता. १३ ः नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. आदिशक्तीच्या उत्सवासाठी शहरातील विविध मंदिरांमध्ये जय्यत तयारी दिसून येत आहे. आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरातही नवरात्रीची तयारी सुरू आहे. मंदिराचा परिसर सुशोभित केला जात आहे. मंदिराला आकर्षक रोषणाईदेखील करण्यात येत आहे.

नवरात्रातील नऊ दिवस मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन दर्शन रांग तयार करण्यात येत आहे. आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मांडव टाकला जात आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गालगत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले आहेत.

काय केले जाते
- घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात सकाळी घटस्थापना
- सायंकाळी ध्वजपूजन केले जाते
- नवरात्रातील नऊ दिवस देवीची नऊ रूपे साकारली जातात
- नऊ रंगाच्या साड्या देवीला परिधान केल्या जातात
- सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते
- दररोज आजूबाजूच्या परिसरातील भजनी मंडळे भजन सादर करतात
- नवरात्रातील पंचमीला सुक्त पठण केले जाते
- अष्टमीला दुपारी होम केला जातो
- नवरात्रातील नऊ दिवस मंदिरात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत नागरिक दर्शनासाठी येतात
- पहाटे पाच वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत मंदिर खुले ठेवतात

तुळजा भवानी देवीचे हे मंदिर जवळपास तीनशे वर्ष जुने आहे. शहरातील पुरातन मंदिरांपैकी एक आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे हे श्रद्धास्थान आहे. नवरात्रात दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता आम्ही पूर्ण तयारी केली आहे.
- धनंजय काळभोर, विश्‍वस्त, श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT