पिंपरी-चिंचवड

अमरजाई माता, वाघजाई माता येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी घटस्थापना

CD

सोमाटणे, ता. १५ ः शेलारवाडी येथील अमरजाई माता, दारुंब्रे येथील वाघजाई माता व सोमाटणे येथील चौराई माता येथे आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी घटस्थापना करण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त आज सकाळी दहा वाजता मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या शेलारवाडी येथील अमरजाई माता मंदिरात अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहुमामा शेलार व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नीलेश भेगडे, सुहास माळी, बाळासाहेब शेलार, दत्तात्रेय माळी, सूर्यकांत सुर्वे, अजय लांगे आदींच्या हस्ते दुग्धस्नान, महाअभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. पुढील नऊ दिवस दररोज पहाटे, दुपारी व सायंकाळी आरती, महाप्रसाद, पारायण, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दारुंब्रे, कासारसाई येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघजाई माता मंदिरात देवस्थानच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता धार्मिक कार्यक्रमांनी घटस्थापना करण्यात आली.
सोमाटणे गावचे श्रद्धास्थान असलेल्या चौराई डोंगरावरील चौराई माता मंदिरात उत्सव समितीचे अध्यक्ष राकेश मुऱ्हे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पुढील नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT