पिंपरी-चिंचवड

Mumbai Pune Expressway: टोल वाचवण्यासाठी द्रुतगतीवर कंपाउंड तोडून अनधिकृत प्रवेश मार्ग,अपघाताचा धोका वाढला

CD

सोमाटणे, ता. २१ ः द्रुतगती मार्गावर कंपाउंड तोडून अनधिकृत प्रवेश मार्ग तयार करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

१९९८ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवासी वाहतुकीच्या सोयीनुसार किवळे, सोमाटणे, उर्से, कुसगाव, खंडाळा आदी ठिकाणी प्रवेश मार्ग ठेवण्यात आले होते. या प्रवेश मार्गाशिवाय अन्य ठिकाणाहून वाहने घुसण्याचे प्रकार कायमचे बंद होण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने संपूर्ण ९४ किलोमीटर अंतराला लोखंडी संरक्षक कठडे बसवण्यात आले होते. परंतु, टोल वाचवणे व अंतर कमी करण्यासाठी काही वाहनचालकांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्याला घुसखोरी करण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

गेल्या काही दिवसात काही स्थानिक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेले व अडथळा ठरणारे लोखंडी कंपाउंडचे कठडे तोडून त्याठिकाणी वाहने आत घुसविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत. सध्या याच तोडलेल्या रस्त्यातून वाहने घुसवण्याचे प्रकार वाढले असून यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

याबाबत वाहनचालक सुरेश माने म्हणाले, ‘‘रात्रीच्या वेळी तोडलेल्या कठड्यातून अचानक जंगली प्राणी घुसतात किंवा वाहने घुसवली जातात, हे अत्यंत धोकादायक असल्याने अपघात होऊ शकतो.’’
रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे म्हणाले, ‘‘जंगली प्राण्यांनी रस्त्यावर प्रवेश करू नये, यासाठी संपूर्ण ९४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याला संरक्षक कठडे बसवले असून, त्याची नियमित दुरुस्ती केली जाते. तोडलेले कठडे तातडीने बंद करण्याची मागणी सोमाटणे येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT