पिंपरी-चिंचवड

एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्प

CD

पिंपरी, ता. १० ः मनासारख्या ठिकाणी मनासारखं घर घेण्याची संधी ‘सकाळ’ने शनिवार (ता. १५) व रविवारी (ता. १६) उपलब्ध करून दिली आहे. कारण, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२३’ आयोजित केले आहे. त्यात शहराच्या विविध भागातील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे.
प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. प्रथम ध्येय असते. ते म्हणजे स्वत:चे शिक्षण पूर्ण करणे. शिक्षण झाले की बहुतांश जणांना हवी असते चांगली नोकरी. नोकरी मिळाली की करावेसे वाटते लग्न. लग्नानंतर मुले, मुलांचे चांगले शिक्षण. आणि त्यानंतर अर्थात चाळीशीत किंवा चाळीशीनंतर स्वतःचं घर शोधणे गरजेचे होते. तेही मनासारखे. प्रशस्त. पण, दररोजच्या धावपळीत मनासारख्या घराचा शोध घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ नसतो. गृहप्रकल्पाची ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. परिणामी इच्छा असूनही मनासारखं घर शोधण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी व घरांची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील व मनातील घर बुक करण्याची आणि आजच दिवस निश्चित करून घराचा मुहूर्त साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्वतःचे घर घेण्याची तुमची इच्छा त्यातून पूर्ण होणार आहे. मनासारखे व बजेटमधले घर शोधण्यासाठीची धावपळ थांबणार आहे. कारण, एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२३’च्या माध्यमातून मिळणार आहे.

घर घेण्यासाठी अनुकूल वेळ
- आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर वाढविले नाहीत
- रेडिरेकनरचे दर न वाढल्याने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची जुन्या दरानेच आकारणी
- रेडिरेकनर दर व मुद्रांक शुल्क वाढ नसल्याने घरांच्या किंमती स्थिर
- अनेकांची पगार वाढ होऊन क्रयशक्ती वाढल्याने बॅंकांकडून कर्ज सुविधा

सकाळ वास्तू एक्स्पोत काय?
- शहर परिसरातील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
- एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार
- वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या घरांची माहिती मिळणार
- घराबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने

काय? कधी? कुठे? केव्हा?
काय? : ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो २०२३
कुठे? : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड
कधी? : शनिवार व रविवार अर्थात १५ व १६ एप्रिल २०२३
केव्हा? : सकाळी ९ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

प्रवेश व पार्किंग : विनामूल्य
संपर्क : ९८८१७१८८४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT