पिंपरी-चिंचवड

भोसरीत महिलेवर वार; गंभीर जखमी

CD

पिंपरी, ता. १० : रस्त्याने जाणाऱ्या महिलेवर एकाने भररस्त्यात धारदार शस्त्राने वार केला. भोसरीतील पीएमटी चौकाजवळ घडलेल्या या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. माया बिऱ्हाडे (वय ३८, रा. गवळीनगर, भोसरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
बिऱ्हाडे या सोमवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास पीएमटी चौकाजवळील एका शाळेजवळील गल्लीतील रस्त्याने जात होत्या. त्यावेळी एकाने चाकूसारख्या शस्त्राने महिलेच्या मानेवर वार केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. हल्लेखोर हा त्यांच्या ओळखीचा असल्याचे समोर येत आहे. मात्र, हा हल्ला कोणत्या कारणावरून केला? हे स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT