पिंपरी-चिंचवड

विद्याथर्त्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा : प्रियांका भोसले

CD

पिंपरी, ता. १५ : ‘‘विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करण्याने आपण आयुष्यातील कोणतीही गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन ती परिस्थिती सांभाळू शकतो,’’ असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ प्रियांका भोसले यांनी चिंचवड येथे नुकतेच केले.
रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (बी. फार्मसी ) व ‘सकाळ यिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘शारीरिक व मानसिक आरोग्य’ या विषयावर प्रियांका भोसले यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भोसले यांनी दैनंदिन जीवनात येणारे ताण-तणाव, पदवीचे शिक्षण घेत असताना येणाऱ्या आव्हानांना मानसिक दृष्ट्या सक्षम बनून कसे सामोरे जावे, त्यासाठी विशेष योग अभ्यास, श्वासांवरील नियंत्रण, सभोवतालची परिस्थिती जाणून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता विकसित कशी करावी? या विषयावर मार्गदर्शन केले. शरीर निरोगी राहिले की मन ही निरोगी राहते आणि आपल्यरिा ध्येयापर्यंत पोहचण्याकरिता प्रयत्नशील राहता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
या उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद धारिवाल, अध्यक्ष शांतिलाल लुंकड, ॲड. राजेंद्रकुमार मुथा यांनी अनेक शुभेच्छा दिल्या. ‘यिन क्लब’ ची आयोजनाची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वालोदे यांनी मांडली. आयोजन महाविद्यालयाच्या ‘यिन’ समन्वयक सहायक प्रा. हर्षदा पुराणिक यांनी केले.

यिन क्लबची स्थापना
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित व्हावे. समाजाप्रती या तरुणाईने कार्यशील राहावे या करिता ‘यिन’ काम करते. आजच्या दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्यांच्यामधील कला गुणांना वाव मिळण्याकरिता, करिअर मार्गदर्शन, त्यासाठीची तयारी या सर्व गोष्टीवर विशेष काम करण्याकरिता यिन क्लब ची स्थापना करण्यात आली. साधारण २० विद्यार्थ्यांचे हे क्लबचे पदाधिकारी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT