पिंपरी-चिंचवड

आरटीई संकेतस्थळ वारंवार बंद

CD

पिंपरी, ता. २२ : आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी; याबाबत पालकांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी)द्वारे निवड झाली आहे. अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता मुदत १३ ते २५ एप्रिल २०२३ पर्यंत दिली आहे., अशा सुचना आरटीईच्या संकेतस्थळावर झळकत आहेत. पण; प्रत्यक्षात आरटीई संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने पालक धास्तावले आहेत.

आरटीईची वेबसाईट गेल्या १५ दिवसांपासून ‘बंद’ आहे. त्यामुळे पालकांना प्रेवशाचे ‘मेसेज’ आले पण प्रवेश घेता येत नाहीत. शिक्षण प्रशासनाकडून संकेतस्थळावर प्रचंड ताण असल्याने ‘हँग’ होत असल्याचे सांगितले जात आहे. आरटीईचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना ‘सर्व्हर’च्या क्षमतेपलीकडे जाऊन ‘पोर्टल स्लो’ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. पण; प्रत्यक्षात संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे. पालक सुरु होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे पालकांना नाहक मन: स्ताप सहन करावा लागत आहे.


‘‘शासनाने १२ एप्रिलपर्यंत मेसेज येतील आणि २५ तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी करायची आहे, असे सांगितले. बहुतांश पालकांना ‘मेसेज’ देखील आले. पण; ऑनलाइन काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे. तर; दुसरीकडे पालकांना फोन येतात की लवकरात लवकर पडताळणी करुन घ्या. अशा प्रकारे पालकांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे.’’
- हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Gas Shortage: केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

SCROLL FOR NEXT