पिंपरी-चिंचवड

महिलेसह पती, भाच्याला टोळक्याकडून बेदम मारहाण

CD

पिंपरी, ता. २२ : जुन्या भांडणाच्या कारणावरून वीस ते बावीस जणांच्या टोळक्याने महिलेसह तिच्या पती व भाच्याला कोयता, हत्याराने बेदम मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरीतील यशवंतनगर व वायसीएम रुग्णालय येथे घडली.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शंकर संभा चौधरी, गौरव शंकर चौधरी, प्रदीप बंकट शिंदे, स्वप्नील महावीर गायकवाड, परमेश्वर चौधरी, अविनाश चौधरी, गौरव चौधरी, स्वप्नील गायकवाड, प्रदीप शिंदे व चार महिला (सर्व रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्यासह आठ जणांवर दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा भाचा व पती यांना आरोपी शंकर, गौरव, प्रदीप व स्वप्नील यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. एका महिला आरोपीने त्यांच्या पाठीत वीट मारली. शंकर व गौरवने उलट्या कोयत्याने फिर्यादीच्या भाच्याच्या डोक्यावर मारून जखमी केले. दरम्यान, फिर्यादीच्या भाच्याला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम येथे नेले असता तेथे परमेश्वर याने फिर्यादीला शिवीगाळ केली. महिला आरोपींनी फिर्यादीचे केस पकडून बेदम मारहाण केली. दुसऱ्या महिला आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. इतर आरोपींनी फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी राजरत्नने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात मारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: बुमराहने दिला हैदराबादला पहिला धक्का! युवा सलामीवीर स्वस्तात बाद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT