पिंपरी-चिंचवड

दुधी भोपळा, भेंडी, कारली महागच

CD

पिंपरी, ता. २३ : लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये फळभाज्यांची आवक १११ क्विंटल तर पालेभाजीची आवक २२ क्विंटल रविवारी (ता. २३) झाली आहे. फळभाज्यांमध्ये दुधी भोपळा, भेंडी, कारली अद्यापही महागलेलीच आहेत. उन्हाळ्याच्या लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची आवकही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे.
कांद्याचे भाव स्थिर असून, ६ ते ८ रुपये किलोप्रमाणे आहेत. भेंडी ३५ ते ४५ रुपये किलो आहे. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तर, कारली सध्या ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून, दुधी भोपळाही २५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. कैरीचा भावही सध्या महाग आहे. त्यामुळे अद्यापही सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही.

फळभाज्यांचे भाव रुपयांप्रमाणे : कांदा : ६ ते ८, भेंडी : ३५ ते ४५, दुधी भोपळा : २५, कारली : ३०, फ्लॉवर : १२, कोबी : ६ ते ८, वांगी : १० ते २०, कैरी : ३०.
पालेभाज्यांचे भाव रुपयांप्रमाणे : कोथिंबीर : ६ ते ८, मेथी : ७ ते ९, शेपू : ५ ते ७, पालक : ६ ते ७, मुळा : ५ ते ८, पुदीना : ३ ते ४, अंबाडी : ६.
फळभाज्यांची आवक क्विंटलमध्ये कांदा : २६, भेंडी : ३, टोमॅटो : २९, दुधी भोपळा : १, कारली : २, फ्लॉवर : २६, कोबी : १५, वांगी : ६, कैरी : २, घोसाळी : १.
पालेभाज्यांची आवक जुडीप्रमाणे ः कोथिंबीर : २४५०, मेथी : १५००, शेपू : ९५०, पालक : ६५०, मुळा : ५५०, चवळी : ३००, पुदीना : १४००, अंबाडी : ८००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

Latest Marathi News Live Update : पिंपळवंडी येथे बिबट्या जेरबंद; परिसरातील नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Nokia 3210 : तब्बल 25 वर्षांनी मार्केटमध्ये पुन्हा आला नोकियाचा आयकॉनिक फोन; किती आहे किंमत? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT