पिंपरी-चिंचवड

ताथवडेत चार आणि पाच मे रोजी ‘महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा

CD

पिंपरी, ता. २३ ः बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांच्या सौजन्याने महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा गुरुवार, ता. ४ मे आणि शुक्रवारी ता. ५ मे रोजी ताथवडे येथे (सिल्व्हर बँक्वेट हॉलजवळ) होणार आहे, असे वर्ल्ड बॉडिबिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन व एशियन बॉडीबिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार विक्रम रोठे यांनी सांगितले.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण आणि खजिनदार सुनिल शेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्चे होत आहे. १२ गटांमध्ये स्पर्धा होणार असून राज्यातील २२ जिल्ह्यातील खेडाळू सहभागी होतील. यात मुंबर्ईचा रस्सेल डिब्रोटो, अजिंक्य रेडेकर, नितीन म्हात्रे, निलेश दगडे, सुशांत राजणकर, उमेश गुप्ता, रोहन गुरव, पिंपरी-चिंचवडचा श्रीनिवास वास्के, तोसिफ मोमीन, अदिती बंब, रेणुका मुदलीयार, शीतल वाडेकर व तन्वीर हक यांच्यात चुरस होईल. विजेत्यांना साडेसहा लाख रुपयांची रोख बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. अजिंक्यपदास सव्वालाख रुपयांचा इनाम आहे. तरुणांना फिटनेस व शरीर सौष्ठवासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे किरण सावंत यांनी सांगितले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT