पिंपरी-चिंचवड

शहरातील ३७ अनधिकृत होर्डिंग काढले

CD

पिंपरी, ता. २४ ः शहरात ५०५ अनधिकृत होर्डिंग आढळून आले आहेत. त्यातील ४३३ चे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित ७२ पैकी ३७ आतापर्यंत काढले असून ३५ होर्डिंग येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने दिली.
किवळे येथे अनधिकृत फलक पडून १७ एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर अनधिकृत व अधिकृत फलकांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिट, राज्य सरकारचे जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यासह अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे. न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या अधिन राहून अनधिकृत व अधिकृत फलकधारकांना परवाना प्राप्त संरचना अभियंत्याचे संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. मंजूर आकारापेक्षा मोठे होर्डिंग त्वरीत काढून घ्यावेत. अन्यथा कारवाई करून गुन्ह दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काढलेले होर्डिंग
मुंबई- बंगळूर महामार्ग, पुनावळे, पुनावळे रोड, ताथवडे, हिंजवडी, वाकड रोड, कासारवाडी, देहू-मोशी रोड, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआडीसी, विनोदे वस्ती, मारुंजी, कस्पटे वस्ती, लोंढे वस्ती, किवळे आदी भागातील ३७ अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले.

न्यायप्रविष्ट प्रकरणातील होर्डिंग व्यतिरिक्त शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढून टाकण्याचा आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिला आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. किवळे येथील घडलेली दुर्घटना उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल. मात्र न्यायप्रविष्ट होर्डिंग्ज धारक यांनी स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT