पिंपरी-चिंचवड

निगडीत सोमवारपासून आमदार चषक स्पर्धा

CD

पिंपरी, ता. २९ ः विधानपरिषद आमदार उमा खापरे आणि बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने एक ते सात मे २०२३ दरम्यान ‘आमदार चषक’चे आयोजन केले आहे. ‘डे-नाईट’ क्रिकेट स्पर्धा होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन होणार आहे. याबाबतची माहिती आयोजक आमदार खापरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा स्टेडिअमवर राज्यस्तरीय मर्यादित षटकांच्या फूल पिच टेनिस बॉल क्रिकेट सामने रंगणार आहेत. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख ५० हजार रुपये, द्वितीय एक लाख ५० हजार रुपये, तृतीय आणि चतुर्थ एक लाख रुपयांचे पारितोषिक असणार आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजांसाठी आकर्षक बक्षीसे असणार आहेत. मालिकावीर यांना आकर्षक टू व्हीलर व प्रत्येक दिवसाच्या सामनावीर यांच्यासाठी एक आकर्षक सायकल भेट देण्यात येणार आहे. यात महिला खेळाडूंचा देखील सहभाग असणार आहे. त्याचबरोबर इतर आकर्षक वैयक्तिक बक्षीसे देखील दिली जाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते समारोप व पारितोषिक वितरण होईल.
सर्व सामने ८ षटकांचे राहतील. एका खेळाडूला एकाच संघातून खेळता येईल. संघ वेळेत न आल्यास बाद केला जाईल. थ्रो (फेकी) गोलंदाज पूर्ण स्पर्धेतून बाद केला जाईल. स्पर्धेत फेरबदलाचे अधिकार संयोजकांकडे असतील. सर्व सामने वन हाफ राहतील. लॉट्स पद्धतीने सामने खेळविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. या वेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, शैलजा मोरे, सुशांत मोहिते, सतीश कुटे, सत्यन देशमुख, संतोष मुळीक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT