पिंपरी-चिंचवड

मोटार उलटल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू चिंचवडमधील घटना, पाचजणी जखमी

CD

पिंपरी, ता. २९ : रस्ता दुभाजकाला मोटार धडकून उलटल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर पाच जणी जखमी झाल्या. ही घटना शनिवारी (ता. २९) सकाळी साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलावर घडली.
कृतिका कौर सोधी (वय २३, रा. महेंद्र एमकेआर सोसायटी, मूळ - दिल्ली) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे तर दिगज्योत धिमन (वय २४, महेंद्र इंफिलिया सोसायटी, पिंपरी), मनी तोमर (वय २३), लुईस बारीतो बेनेझोला (वय २४), दृष्टी ठक्कर (वय २४), अनुष्का यादव ( सर्व रा. डी. वाय. पाटील कॉलेज गर्ल्स हॉस्टेल, पिंपरी) अशी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या सर्व विद्यार्थिनी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास सर्व मैत्रिणी मोटारीतून थेरगाव येथे निघाल्या होत्या. दरम्यान, चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावरून जात असताना मोटार रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. या भीषण अपघातात मोटारीतील सर्व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कृतिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार विद्यार्थिनींना पिंपरीतील रुग्णालयात तर एकीला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT