पिंपरी-चिंचवड

पिंपरीत तरुणावर प्राणघातक हल्ला

CD

पिंपरी, ता. २९ : मेडिकलमधून पिण्याच्या पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयता गॅंगने तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मेडिकलची तोडफोड करीत नुकसान केले. ही घटना पिंपरीतील मेडीमार्ट मेडिकल शॉप येथे घडली.

याप्रकरणी अर्जुन नानकचंद वाल्मीकी (वय २७, रा. अशोकनगर, लिंकरोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहित सिंग (वय १९), अनिकेत हातमकर (वय १९), राहुल यादव (वय १९), साईनाथ पाटोळे (वय १९) यांना पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर किरण प्रकाश डोंगरे (वय १९, रा. मिलिंदनगर, पिंपरी), अवि निंबाळकर (वय १९) व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी हे मेडीमार्ट मेडिकल शॉपमध्ये काम करीत असताना, या टोळीतील एकाने पिण्यासाठी पाण्याची बाटली घेतली. त्यानंतर फिर्यादीने या बाटलीचे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपींनी ‘तुला आता सोडणार नाही, तुला खल्लास करून टाकतो. के.डी.भाईच्या पोरांना पैसे मागतो का, आताच खराळवाडीत एकाला फोडून आलो आहे, तोडफोड केलीय. त्याप्रमाणेच तुझ्या मेडिकलला फोडू, इथे फक्त केडी भाईचा राज आहे.’ असे धमकावत जबरदस्तीने मेडिकलमध्ये शिरले. फिर्यादीवर कोयत्याने वार करून, दुकानातील फ्रिजवर ठेवलेली अडीच हजारांची रोकड व फ्रीजमधील कोल्ड्रिंक्‍सच्या बाटल्या घेतल्या. तसेच काऊंटरची काच कोयत्याने फोडली. कोयता हातात मिरवून परिसरात दहशत माजवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT