पिंपरी-चिंचवड

गहुंजेत कोंबड्या वाहतूक करणारा टेम्पो पलटी

CD

पिंपरी, ता. ३० : कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. दोन्ही टेम्पोचालकासह तिघे जखमी झाले. तसेच टेम्पोतील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गहुंजे येथे घडली.
जिलानी खान (वय ३०, रा. मुंबई), टेम्पोचालक अबीम खान व धडक देणारा टेम्पोचालक शिवदयाल यादव (वय ३०, रा. मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. जिलानी खान यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे टेम्पोचालक अबीम यांच्यासमवेत साताऱ्यातील वाई येथून मुंबईला कोंबड्या घेऊन निघाले होते. दरम्यान, गहुंजे येथे पाठीमागून भरधाव आलेल्या शिवदयाल याच्या टेम्पोने जिलानी यांच्या टेम्पोला जोरात धडक दिली. यात जिलानी यांचा टेम्पो पलटी झाला. या अपघातात तिघेही जखमी झाले. तसेच टेम्पोतील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT