पिंपरी-चिंचवड

कामगार दिनानिमित्त परिवर्तन बाईक रॅली

CD

पिंपरी, ता. २ : आम आदमी पार्टीच्या वतीने कामगार दिनानिमित्त परिवर्तन बाईक रॅली काढण्यात आली. पिंपरी विधानसभा अंतर्गत या रॅलीचे आयोजन आपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले होते.
उद्योगनगरी म्हणून आपली ओळख जपणारे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी शहरात वसलेल्या कामगार बंधूंना मानवंदना देण्यासाठी या रॅली चे आयोजन केल्याचे संतोष इंगळे यांनी सांगितले. ही परिवर्तन बाईक रॅली एच. ए. मैदानातून दुपारी ४ वाजता सुरू होऊन सायंकाळी ७ वाजता आकुर्डी येथील शहीद कामगार दत्तात्रेय पाडळे यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. या रॅलीमध्ये आम आदमी पार्टीचे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीद कामगार दत्तात्रेय पाडळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये चेतन बेंद्रे, अनुप शर्मा, संतोष इंगळे, ब्रह्मानंद जाधव, राज चाकणे, डॉ. अमर डोंगरे, कमलेश ननावरे व शहरातील आम आदमीचे पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT