पिंपरी-चिंचवड

‘जात वैधता’ न दिल्याने अभियंत्याची पदावनती

CD

पिंपरी, ता. ११ ः पदाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र सादर न केल्याने महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याची उपअभियंता पदावर पदावनती करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला. शिरीष पोरेड्डी १९९१ पासून महापालिका सेवेत आहेत. एसटी आरक्षित पदावर कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले. २००७ मध्ये त्यांना उपअभियंता पदावर व २०२० मध्ये कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळाली होती. मात्र, त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत एसटीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश २००७ मध्ये दिला होता. त्यांनी २००८ मध्ये एसबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांना खुला प्रवर्गातून कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळाली होती. मात्र, सरकारच्या २०१९ च्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते सादर न केल्याने त्यांना उपअभियंता पदावर पदावनत करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT