पिंपरी-चिंचवड

पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी रस्त्यांची खोदाई

CD

पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी रस्त्यांची खोदाई

शहरातील स्थिती; अरुंद रस्त्यांवर वाहनचालकांची गैरसोय


पिंपरी, ता. २१ ः विविध सेवा वाहिन्या टाकणे, जुन्या वाहिन्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांची डागडुजी करण, रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची प्रलंबित कामे यासाठी शहरातील बहुतांश भागात रस्ते खोदाईची कामे सुरू आहेत. पावळ्यापूर्वी कामे उरकरण्याची घाई असली तरी वाहनाचालकांसह पादचारी नागरिकांची अरुंद रस्त्यांच्या ठिकाणी गैरसोय होत आहे.
शहराच्या विविध भागात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही रस्ते ‘स्मार्ट’ पद्धतीने तर काही रस्ते ‘अर्बन स्ट्रिट’ योजनेनुसार केले जात आहेत. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या परिसरात शहराचे सौदर्य वाढल्याचे दिसून येत आहे. त्या परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला सायकल मार्ग उभारला आहे. त्या शेजारी पदपथ उभारले आहेत. शिवाय, रस्ता दुभाजकांवर व पदपथांच्या कडेला शोभेची झुडुपे लावली आहेत. अशाच पद्धतीने नियोजन करून काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, मे महिना निम्मे अधिक संपला असून पावसाळा जवळ आला आहे. या पार्श्वूभूमीवर महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या खोदकामास मनाई केलेली आहे. मात्र, यापूर्वी मंजूर केलेली कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यामुळे प्रशासन टार्गेट झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी ३० मेपूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा आदेश महापालिका प्रशासकांनी स्थापत्य विभागाला दिला आहे. त्यादृष्टिने कामे सुरू असल्याचे चित्र शहरात आहे.

इथे सुरू आहेत कामे
- पीसीएमटी-लांडेवाडी चौक भोसरी ः कॉंक्रिटीकरण
- भक्ती-शक्ती ते टिळक चौक निगडी ः भुयारी मार्ग
- यशवंतनगर ते गवळीमाथा टेल्को रोड ः रस्त्याच्या उंचीत वाढ
- राजेशिवाजी चौक ते अलंकापूरम चऱ्होली ः सेवावाहिनी
- मोशी ते डुडुळगाव रस्ता ः जलवाहिनी
- मोशी उपबाजार ते जाधववाडी रस्ता ः जलवाहिनी
- पीएमटी चौक ते शास्री चौक भोसरी ः जलवाहिनी
- चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी रस्ता ः पदपथ, सायकल मार्ग, विविध वाहिन्या
- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ते लिंग रोड ः अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण

माझा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी एका खड्ड्यात आदळून टेम्पोचा पाटा तुटल्याने तो बराचवेळ रस्त्यात उभा करावा लागला होता. अशा खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान अधिक होते. त्यामुळे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करायला हवी.
- दीपक वाघ, वाहनचालक, थेरगाव

भोसरी एमआयडीसीत मी कामाला आहे. अलंकापूरम ते वखार महामंडळ चौक रस्त्याने जातो. गेल्या वर्षीच महापालिकने या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. आता हाच रस्ता एका बाजूने खोदून कसली तरी केबल टाकली जात आहे. खोदकामाच्या ठिकाणी मोटारसायकल घसरून पडण्याती भिती असते.
- सुरेश वाघ, वडमुखवाडी, चऱ्होली

कोणत्याही कारणास्ताव १५ मे पासून रस्ते खोदाईस महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मनाई आहे. अत्यावश्यक काम म्हणून खोदाई करायची असेल, तर त्यास आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ३० मेपर्यंत सर्व कामे संपवून रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन आहे.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता महापालिका
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT