पिंपरी-चिंचवड

उपयोगकर्ता शुल्काला तीव्र विरोध

CD

पिंपरी, ता. २५ : महापालिकेने मिळकत कराव्यतिरिक्त आकारलेल्या उपयोगकर्ता शुल्काला शहरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. या बाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. २४) वृत्त दिले होते. त्याचे पडसाद शहरात उमटले आहेत.
महापालिकेने करदात्यांवर लादलेला ‘उपयोगकर्ता कर’ म्हणजे ‘जिझिया कराची’ पुनरावृत्ती, असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला आहे तर; महापालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये लादण्यात आलेले वाढीव ‘उपयोगिता शुल्क कर’ रद्द करावे व महिला मिळकत करदात्यास असलेली ५० टक्के असणारी सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी शहर समितीच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष सूरज गायकवाड यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
शहरातील जनतेवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करणेबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने महापालिका उपआयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, प्रदीप गायकवाड, नीलेश शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ओम क्षीरसागर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
हा कर लादण्याच्या महापालिकेच्या एक अधिकारशाही निर्णयांना राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा उपयोगकर्ता कर रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिकेतर्फे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला.
दरम्यान; गायकवाड यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने उपयोगिता शुल्काच्या नावाखाली मिळकत करामध्ये घरामागे लावण्यात आलेले १२६० रुपये रद्द करावे तसेच महापालिकेची पूर्वी असलेली महिला मिळकत करदात्यास ५० टक्के असणारी सवलत पूर्ववत करावी. आगाऊ रक्कम भरल्यास अगोदर दहा टक्के सवलत मिळत होती. ती कमी करून पाच टक्के केली आहे, ती पूर्ववत १० टक्के सवलत देण्यात यावी. याची दखल घेऊन लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT