cemetery
cemetery sakal
पिंपरी-चिंचवड

Dighi Cemetery : ‘मृतांच्या टाळूवरच लोणी’ खातय कोण?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - दिघी स्मशानभूमीमध्ये कंत्राटवरील कामगार मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडे अंत्यविधीसाठी पैशांची लूटमार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाइकांना अंत्यविधीसाठी लाकडे, गवरी उपलब्ध करून देण्यासाठी दुप्पट पैसे उकळत आहे. पाच रुपयाची गवरी, पंधरा रुपये तर; लाकडे चारशे रुपये मण दर असताना आठशे रुपये मन दराने विक्री करताहेत.

अशाप्रकारे अंत्यविधीसाठी अव्वाचे सव्वा पैसे उकळण्याचे काम कर्मचारी करत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ‘मृतांच्या टाळूवरच लोणी’ खाण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

गेल्या कोरोनापासून शुभम उद्योग नावाच्या संस्थामार्फत महापालिकेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दिघी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून साहित्य आणण्यासाठी अधिकचे पैसे उकळत आहेत. अंत्यविधीसाठी लाकडे, गवरी उपलब्ध करून देण्याचे प्रकार करत आहे. लाकडे पाच मण आणले, असे सांगून तीन मण लाकडात अंत्यविधी पूर्ण करतात.

मृत व्यक्तीचे लोक मोजायला वजन करायला नसतात. त्याचा गैरफायदा घेत लुट करत आहे. तेल, तूप, मीठ यांचे पुडे मोठ्या प्रमाणात घ्यायला लावून त्यांतही ‘गोलमाल’ करत आहे. एकीकडे व्यक्तीचे नातेवाईक मृत झाले आहेत. त्या व्यक्तीचे पाहुणे, मित्र परिवार अंत्यविधीची तयारीत असतात. जेव्हा अंत्यविधी पूर्ण झाला की अव्वसव्वा पैसे उकळण्याचे काम हे कंत्राटी कामगार करत आहे.

कामगार कामावर नसतात

दिघी स्मशानभूमीत हे कामगार कामावर हजर नसतात. त्यांच्या शाळेच्या स्कूल बस आहेत. त्यावर हे काम करतात. मोकळ्या वेळेत स्मशानभूमी येथे पत्त्यांचा डाव खेळतात. स्मशानभूमीत जुगार खेळणे, झोपा काढणे, रात्रपाळी असताना घरीच झोपणे, असे प्रकार सुरू आहेत. याठिकाणी चांगले कामगार नियुक्त करून करावेत. दिघी स्मशान भूमी येथे ‘सीसीटीव्हीं कॅमेरे’ यावे, अशी मागणी नातेवाईक संतोष वाळके यांनी केले आहे.

‘दिघी स्मशानभूमीबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार करावी. संबंधित ठेकेदारावर आठ दिवसात कारवाई करता येईल.’

- गणेश देशपांडे, मुख्‍य आरोग्य अधिकारी, महापालिका

‘ज्या कर्मचाऱ्यांनी अगाऊ पैसे घेतले आहेत. अशांची ओळख पटवून माहिती द्यावी. त्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करू. नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांबरोबर आर्थिक व्‍यवहार करू नयेत.’

- बाळासाहेब वाघेरे, कंत्राटदार, शुभम उद्योग संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT