पिंपरी-चिंचवड

उड्डाणपुलाजवळ ‘ओपन बार’, काहींचा भरतोय दर''बार’ भोसरीतील स्थिती, पोलिसांच्या दुर्लक्षाने झिंगलेल्या तळीरामांचा महिलांना त्रास

CD

पिंपरी, ता. ११ ः भोसरीमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावरच ‘ओपन बार’ सुरु आहे. दारूच्या दुकानाशेजारील हातगाड्या हॉटेलही बिअर बार बनले आहेत. काही ठिकाणी ‘ओपन बार’जवळच आपल्या चेल्यांना जमवून दर''बार’ भरवून टाइमपास करत आहेत. त्याचा महिला व मुलांना प्रचंड त्रास होत आहे. पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे.
भोसरीत भोसरी पीएमपील बीआरटीएस परिसरात, राजमाता उड्डाणपुलाखालील परिसरात ठिकठिकाणी ओपन बार सुरु आहेत. जवळच दारुची दुकाने असल्याने तळीराम विविध वाहने, रिक्षात तसेच रस्त्यांवर व खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर बसून दारू पितात. अनेकदा त्यांचा मुक्कामच तिथे असतो. त्यांच्यात अनेकदा वाद व शिवीगाळ होते. उघड्यावर लघुशंका केली जाते. शालेय विद्यार्थी, महिला व लहान मुलांना त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. या परिसरात व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि बकालपणा दिसून येत आहे.

रस्त्यावरच अवैध पार्किंग
भोसरी पीएमपील बीआरटीएससमोर असलेल्या दारूच्या दुकानात येणारांची वाहने मुख्य रस्त्यावर बेशिस्तपणे व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने लावली जातात. तसेच स्वतःच्याच वाहनात बसून दारू पिली जाते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. तिथे छोटे-मोठे अपघात तर नित्याचे झाले आहेत. वाहतूक पोलिस मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात, हे अनेकदा दिसून आले आहे.

वाहतूक कोंडी व बकालपणा.
भोसरीमध्ये अंकुश लांडगे नाट्यगृहाजवळ सकाळच्या वेळी भरणाऱ्या मजूर अड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मजूर नाक्यावरील लोक बिनधास्तपणे व बेशिस्तपणे वाहतूक अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने थांबतात. त्यामुळे भला मोठा वाटणारा पुणे नाशिक रोड फक्त १० ते १५ फुटांचा वाटतो. तसेच जवळच असणाऱ्या बीआरटीएस टर्मिनसमधून सुटणाऱ्या बसला वळसा घालून जावे लागते. परंतु या ठिकाणी मजूर नाक्यावरील लोकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व पीएमपीएल बसला ‘यू टर्न’ मारण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, अस्वच्छता व बकालपणा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मजूर नाक्याचे इतरत्र स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांकडून काणाडोळा
‘ओपन बार’मुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकही पुरते हैराण झाले आहेत. मात्र, याकडे पोलिस प्रशासन सोईस्कर व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलिसांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT