पिंपरी-चिंचवड

शहरात डेंगी, चिकनगुनियाचा धोका प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून तयारी, स्वच्छता राखण्याचे आवाहन

CD

पिंपरी, ता. ११ ः गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. पावसाचे पाणी साचून, त्यावर डासांची उत्पत्ती झाल्याने डेंगी, चिकनगुनियासारख्या रोगांना निमंत्रण मिळू शकते. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. त्यासाठी शहरात मासक्युटो अबेटमेंट समितीची स्थापना केलेली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आदेश गृहनिर्माण सोसायटी, औद्योगिक आस्थापनांना देण्यात आले आहेत. तसेच घरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांना महापालिकेच्यावतीने केले आहे.

अशी घ्या काळजी....
डेंगी व चिकनगुनियाचा प्रसार करणाऱ्या डासांची मादी स्वच्छ पाण्यावर अंडे घालते. त्यामुळे घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून साफ करून भरावीत. पाण्याच्या मोठ्या टाक्या झाकणाने घट्ट बंद कराव्यात. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजच्या खालचे ट्रे हे देखील आठवड्याला रिकामे करावेत. घराच्या गच्चीवर अथवा बाल्कनीमध्ये कोणतेही भंगार साचू देऊ नये. तसेच घराच्या आजूबाजूला पाण्याची असतील तर ती डबकी बुजवावीत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.


काय आहेत लक्षणे
ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी याबरोबरच उलट्या होणे, भूक मंद होणे, घशाला कोरड पडणे, पोट दुखणे ही डेंगीची लक्षणे आहेत. तर कमी अवधीचा तीव्र ताप, सांधेदुखीबरोबरच अंगावर पुरळ येणे ही चिकनगुनियाची लक्षणे आहेत. यातील कोणतीही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या दवाखान्यातून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाकडून औषध फवारणी
डासोत्पती होणारी स्थाने नष्ट करण्यासाठी घरांचे कंटेनर सर्वेक्षण, व्यवसायांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेची आठ रुग्णालये व दवाखाने या ठिकाणी डेंगीच्या तपासणीसाठी आवश्‍यक रॅपिड किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. चिकनगुनिया अथवा डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या वास्तव्याच्या ठिकाणी डासांच्या उत्त्पत्तीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.


़‘‘पावसाळ्यात उद्भवणारे डेंगी, चिकनगुनिया यासारखे रोग पसरू नयेत, यासाठी नागरिकांनीही वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या ८ रुग्णालये व ३४ दवाखान्यांमध्ये यावर उपचारासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
-डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT