पिंपरी-चिंचवड

स्तनपानाविषयी वाढतेय जागरूकता

CD

जागतिक स्तनपान सप्ताह


अश्‍विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ : ऑगस्टचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. मातांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांचे स्तनपानाविषयीच्या अडचणी दूर व्हाव्यात व जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा आठवडा साजरा करण्यास सुरुवात झाली. या आठवड्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांची जनजागृती केली जाते. पण सध्या अनेक संस्था वर्षभरही यासाठी काम करीत आहेत. आईचे दूध हा प्रत्येक नवजात बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्‍यक बाब आहे.

कधी गैरसमजुतींमुळे, कधी आईला दूध पुरेसे येत नसल्यामुळे बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागते. योग्य वैद्यकीय सल्ला, योग्य आहार व काळजी घेतली तर प्रत्येक माता आपल्या बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करू शकते. इच्छाशक्ती असेल व दूध जास्त असेल तर; आपले दूध दानही करू शकते. या बाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय या रुग्णालयांमध्ये विशेष समुपदेशन केले जात आहे.

स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न
वायसीएम रुग्णालयात वेगवेगळ्या स्तरातून गर्भवती महिला प्रसुतीसाठी येत असतात. या महिलांना स्तनपानाविषयी माहिती देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निवडण्यात आलेला आहे. प्रसूतीनंतर पुरेसे दूध येण्यासाठी काय काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा याबाबत इत्थंभूत माहिती दिली जाते. बाळंत मातांच्या सर्व शंकाचे निरसन केले जाते. त्याचा परिणाम म्हणून मातांमध्ये स्तनपानाबाबत जागरूकता दिसत आहे. पण दूध दान करण्याबाबत अजून काम करणे गरजेचे आहे, असे रुग्णालयाच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके यांनी सांगितले. स्तनपानाबरोबरच मातेला दूध दान करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत असतो. मात्र, वायसीएम रुग्णालयात ‘मिल्क बॅंक’ नसल्याने त्यावर मर्यादा येतात. ससूनप्रमाणेच ‘वायसीएम’मध्येही मिल्क बॅंक सुरू करावी, असे मतही डॉ. अंबिके यांनी व्यक्त केले.


दूध दान करण्यासाठी ह्यूमन मिल्क बँक’
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात २०१३ मध्ये शहरातील पहिली ह्यूमन मिल्क बॅंक’ सुरू करण्यात आली. ज्या बालकांना आपल्या आईचे दूध मिळत नाही, त्यांना ते उपलब्ध करून देणे, मातांना दूध दान करण्यात प्रोत्साहन देणे, असा या मागचा उद्दे‍श होता. पहिल्या वर्षात केवळ दोनशे बावीस मातांनी आपले दूध दान केले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत ही आकडेवारी वाढली आहे. या वर्षी ३० जूनपर्यंत ७३९ मातांनी दूध दान केले आहे. या रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना प्रसूती आधीपासूनच स्तनपानाविषयीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. त्यासाठी आठवड्यातील पाच दिवस येथे विशेष कक्ष चालवला जातो. मातेने दान केलेले दूध आणण्यासाठी ‘मिल्क व्हॅन’ची सोय केलेली आहे. दान केलेल्या दुधाचे योग्य पद्धतीने जतन केले जाते, अशी माहिती रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉ. शैलजा माने यांनी सांगितले.

‘गेल्या दहा वर्षांमध्ये सोळा हजार मातांनी मिल्क बॅंककडे दूध दान केले आहे. ज्याचा फायदा २३ हजार शिशुंना झाला आहे. २०२० मध्ये म्हणजेच कोरोना काळात जेव्हा ह्यूमन मिल्क’ची गरज होती. याच काळात सर्वात जास्त म्हणजेच १८२२ मातांनी आपले दूध दान केले.’ अशी माहिती त्यांनी दिली


ह्यूमन मिल्क बॅंकबद्दल सुशिक्षित महिलांनाही फारशी माहिती नाही. अनेक गैरसमजही आहेत. एखाद्या आईला काही कारणास्तव दूध येत नसेल किंवा आईचा मृत्यू झाला असेल. तर बाळाला वरचे दूध देण्याची गरज पडते. अशा वेळी मातेने दान केलेले दूध दिल्यास बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

- डॉ. शैलजा माने, प्रमुख, बालरोग विभाग, डॉ. डी. वाय. वाटील रुग्णालय

‘खासगी मिल्क बॅंकेमध्ये दूध विकत घेण्यासाठी ठराविक दर आकारले जातात. मात्र, ‘वायसीएम’सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये जर ह्यूमन मिल्क बॅंक सुरू झाली. तर त्याचा फायदा सर्व स्तरांतील मातांना होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना आम्ही दूध दान करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो.’
- डॉ. दीपाली अंबिके, प्रमुख , बालरोग विभाग, वायसीएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT