पिंपरी-चिंचवड

निगडीत आजपासून विचार प्रबोधनपर्व

CD

पिंपरी, ता. ३१ ः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेने पाच दिवसीय विचार प्रबोधनपर्व आयोजित केले आहे. निगडीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील प्रांगणात मंगळवारपासून (ता. १) शनिवारपर्यंत (ता. ५) कार्यक्रम होतील. त्यात प्रबोधनात्मक चर्चासत्र, परिसंवाद, वृक्षारोपण, कीर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त सिंह यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता निगडीतील साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचार प्रबोधन पर्वाला पारंपरिक सनई वादनाने प्रारंभ होईल. त्यानंतर हलगी वादनाची जुगलबंदी होईल. प्रबोधनपर्व काळात सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत विविध कार्यक्रम होतील. यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे आदींचे सहकार्य लाभणार आहे. शनिवारी (ता. ५) रात्री साडेआठ वाजता सिनेकलाकार प्राजक्ता महामुनी व दीप्ती आहेर यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाचा समारोप होईल.

योजनांची माहिती...
महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रबोधन पर्वात दिली जाणार आहे. शिवाय, रोजगार मेळाव्याचे आयोजनही केले जाणार आहे. विविध ठिकाणी ५०० झाडांची रोपे लावली जाणार आहेत.

महिलांसाठी उपक्रम
गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेअकरा वाजता महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम होईल. अभिनेत्री गुरुमित कौर यांचे महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. तसेच, आरोग्यासाठी स्त्री-रोग तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

उद्योजकता मार्गदर्शन
महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस’तर्फे उद्योजकता प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन होईल. विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाच्या संधी, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT