पिंपरी-चिंचवड

वल्लभनगर आगारातून गुरुवारी अष्टविनायक दर्शन बससेवा

CD

पिंपरी, ता. ३१ ः अष्टविनायक दर्शनाला जाण्याची अनेकांची भाविकांची इच्छा असते, पण महागलेल्या प्रवास खर्चामुळे जाणे टाळतात. यामुळे एस. टी. महामंडळातर्फे दर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायक दर्शनासाठी बसची सोय करून दिली आहे. यासाठी शहरातील वल्लभनगर आगारांमधून अष्टविनायक दर्शन यात्रा बस गुरुवारी (ता.३) सकाळी साडेसहाला रवाना होणार आहे.

शहरांमधून अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यंदा जानेवारी महिन्यातील अंगारकीला आगारांमधून अष्टविनायक दर्शनासाठी आठ बस सोडण्याचा विक्रम झाला. त्याला भाविकांचा प्रतिसाद पाहता वेळेवर बसची आगाऊ नोंदणी केली जाते. अष्टविनायकसाठी दोन बसची सोय केली आहे. त्यापैकी एका बसचे बुकिंग फुल्ल झाली आहे. अष्टविनायक दर्शन सेवेत थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, लेण्याद्री, महाड, पाली अशी पॅकेज टूर जाहीर झाली आहे. दोन दिवसांच्या या अष्टविनायक दर्शनासाठी पिंपरी-चिंचवड ते अष्टविनायक प्रवासादरम्यान प्रौढांना १०००, तर लहान मुलांसाठी पाचशे रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे. यासाठी बस स्थानकावर अथवा महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आरक्षणाची सोय केली आहे.


या दोन दिवसांच्या प्रवासादरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी ओझर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना हा खर्च वैयक्तिक करावा लागणार आहे. तरी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख संजय वाळवे यांनी केले आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेतली

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

Akola News : अकोल्यात गॅस संकट तीव्र! १० दिवसांपासून सिलिंडर नाही; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT