पिंपरी-चिंचवड

भोसरी ‘टी ब्लॉक’मधील अतिक्रमण त्वरित काढावे

CD

पिंपरी, ता. २५ : महापालिकेच्या जागेवरील भोसरी एमआयडीसी ‘टी’ ब्लॉक येथे केलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी विभागाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
एमआयडीसी ‘टी’ ब्लॉकमधील जय भवानी माता इंजिटेक प्रा. लि. भूखंड क्रमांक १४९//१, १५०, १५१, १५२, १५३ व एम. के. प्रोसेस सिस्टीम प्रा. लि. भूखंड क्रमांक. ई-६ एमआयडीसी भोसरी येथील दोन्ही कंपन्यांनी महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका ज्या पद्धतीने गोरगरीब जनतेच्या टपरी, हातगाडी व छोटे मोठे अतिक्रमण यांच्यावर तत्परतेने कारवाई करीत आहेत, तशाच प्रकारची तत्परता दाखवून वरील दोन्ही ठिकाणचे केलेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी निसर्गंध यांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनाची प्रत ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनाही दिलेली आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी चंद्रकांत उचे यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT