पिंपरी, ता. १८ ः ‘आम्ही सर्व प्रतिज्ञा करतो की, आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू. तसेच, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवू’, अशी प्रतिज्ञा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली. उपआयुक्त विठ्ठल जोशी, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अय्यंगार, चारुशीला जोशी आदी उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. दिवंगत पंतप्रधान गांधी यांची जयंती २० ऑगस्ट रोजी आहे. त्याच दिवशी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात येते. मात्र, २० ऑगस्ट रोजी रविवार सार्वजनिक सुट्टी असल्याने १८ ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्याबाबत सरकारने कळविले होते, त्यानुसार प्रतिज्ञा घेण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.