Ajit Pawar NCP esakal
पिंपरी-चिंचवड

Ajit Pawar : आम्ही विचारधारा सोडलेली नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण; नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांचे कौतुक

‘आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर ही आमची विचारधारा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘देशात प्रशस्त रस्त्यांची निर्मिती’, ‘विमानतळ व रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण’, ‘चांद्रयान-३ चे यश’, ‘जागतिक अर्थव्यवस्थेत पाचवा क्रमांक असताना, देशाला तिसऱ्या स्थानावर आणण्याचा संकल्प’, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चिंचवडमध्ये तोंड भरून कौतुक केले.

‘आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर ही आमची विचारधारा आहे. संतांचा विचार घेऊन, आम्ही चालत आहोत, तो विचार समाजाला दिशा देणारा आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये सहभागी होऊन, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले. अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

काही कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि चिंचवड येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याबरोबरच भविष्यातील वाटचालीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा, विधानसभासह आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार आहे. मात्र, महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी ठरवावे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सत्तेसाठी नाही, तर विकासकामे होण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहे. जातीय सलोखा राहण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहावी, हा उद्देशही त्यामागे आहे. नात्यागोत्याचे, जातीयतेचे राजकारण करायचे नसून, सर्वसामान्यांची कामे करायची आहेत.’’

अजित पवार म्हणाले....
- नऊ वर्षातील प्रगती व चांद्रयान मोहिमेमागे पंतप्रधान मोदी यांचे मजबूत नेतृत्व
- निगडी ते कात्रज मेट्रोने जोडण्यासाठी राज्य सरकारचा हिस्सा देणार
- सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वांशी विचार करून घेतला
- सर्वांना सुरक्षित वाटावे, अशी आमची भूमिका

‘नो कॉमेंट्स
महापालिकेत आढावा बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘अजित पवार आमचे नेते आहेत’, या शरद पवार यांच्या विधानाबाबत विचारले असता, त्यांनी, ‘नो कॉमेंट्स’ म्हणून बोलणे टाळले. ‘तुम्ही साहेबांच्या वक्तव्याकडे कसे पाहता,’ असे विचारल्यावर ‘तुम्ही जसं पाहता, त्याच्या उलट पाहतो,’ असे वक्तव्य त्यांनी केले. प्रत्येक राजकीय प्रश्नांवर ‘नो कॉमेंट्स’ म्हणत ‘विकासाचं बोला ना!’ असे सुचविले.

‘चांद्रयान’बाबत मागितली माफी
‘चांद्रयान-३’ मोहिमेबाबत अजित पवार यांनी ‘चंद्रकांत’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर माफी मागत पवार म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना चूक व्हायला नको. पण, कामाच्या व्यापात चुकलो. मी माफी मागतो. चूक झाली की माफी मागणारा मी कार्यकर्ता आहे.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात मी हस्तक्षेप करत नाही. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT