Ganpati sakal
पिंपरी-चिंचवड

Ganeshotsav : गणेश भक्तांचा पीओपीच्या गणेश मूर्ती खरेदीकडे कल

वातावरणात चैतन्य, ऊर्जा आणणारा गणेशोत्सव १५ दिवसांवर आला आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वातावरणात चैतन्य, ऊर्जा आणणारा गणेशोत्सव १५ दिवसांवर आला आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे. मंडप, सजावट, आरास, मूर्ती, नैवेद्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. या उत्सवाच्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून...

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात होते, ती पर्यावरणपूरक गणेशमूर्तीपासून. ‘पीओपी’च्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, गणेश सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन दरवर्षी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून केले जाते.

त्यानुसार अनेकजण शाडूच्या मूर्तींना पसंती देताना दिसत आहेत. मात्र, पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींचे उत्पादन, मागणी व खरेदीचा कल पाहता; यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती विकत घेण्याकडेच गणेशभक्तांची संख्या तुलनेने जास्त आहे.

गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने सजू लागली आहेत. आपल्या आवडीची मूर्ती बुक करण्यासाठी भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे. पण शहरातील मूर्ती विक्रेत्यांमध्ये ‘पीओपी’च्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या पाहता शाडूच्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या अगदीच कमी आहे.

शाडू मातीच्या मूर्तींबाबत नागरिकांमध्ये अद्याप पुरेशी जागरूकता नाही. अनेकदा विक्रेते शाडू मातीच्या मूर्ती म्हणून पीओपीच्या मूर्तींची विक्री करतात. शाडूच्या मूर्ती महाग असल्याने अनेकदा नागरिकांचे तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी नसते. त्यामुळे नागरिकांचा कल पीओपीच्या मूर्तींकडे जास्त असतो, असे मूर्तिकारांनी सांगितले.

उत्पादनाची खर्चिक प्रक्रिया

पीओपीच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ लागतो. ही माती गुजरातच्या नर्मदा खोऱ्यातून आणली जाते. साहजिकच पीओपीच्या तुलनेत या मूर्तीचे उत्पादन कष्टाचे व खर्चिक आहे.त्यामुळे या मूर्ती महाग असल्याचे मूर्तिकार सांगतात. त्यामुळे शाडू मातीच्या अगदी चार इंचाच्या मूर्तीची किंमत कमीत कमी सहाशे रुपये एवढी असते. मात्र; याच किमतीमध्ये पीओपीची एक फुटाचीही मूर्ती विकली जाते. या तुलनेमुळे यामुळे नागरिक शाडूच्या मूर्ती कमी प्रमाणात खरेदी करतात.

मागणी वाढली पण संख्या कमी

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शाडूच्या गणेशमूर्तींची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. पण, वाढलेली लोकसंख्या, मंडळांची वाढलेली संख्या, घरगुती गणेशोत्सवासोबतच सोसायटीमध्ये गणपती बसविण्याकडे नागरिकांचा वाढलेल्या कल या सर्व गोष्टींचा विचार करता गणेशमूर्तींचे उत्पादन व विक्री देखील वाढली आहे. त्यामुळे अजूनही फक्त २० टक्के नागरिकच शाडूच्या मूर्ती खरेदी करतात. ८० टक्के नागरिक मात्र ‘पीओपी’च्याच मूर्तींना प्राधान्य देतात.

पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यासाठी अनेकदा प्रशासन केवळ चर्चा करते. मात्र, घोषणा होत नाही. या मूर्तिकारांना जर शाडू माती उपलब्ध करून दिली तर साहजिकच उत्पादन वाढेल. मागणी वाढली की मूर्तींच्या किंमती कमी होतील. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर यावर विचार होणे आवश्‍यक आहे.

- प्रीतम थोरात, मूर्तिकार व विक्रेते.

पर्यावरणपूरक न होण्याची कारणे काय?

- पीओपीच्या गणेशमूर्तींचे बाजारात विक्रीसाठी अधिक प्रमाण

- ‘पीओपी’च्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींच्या जास्त किमती

- शाडूची मूर्ती कशी ओळखावी याबाबत असणारा माहितीचा अभाव

- शाडूच्या मूर्तीच्या नावाखाली ‘पीओपी’च्या मूर्तींची केली जाणारी विक्री

- नागरिकांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती घेण्याबाबत असलेली उदासीनता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT