पिंपरी-चिंचवड

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरात भक्तांची गर्दी

CD

पिंपरी, ता. ६ ः राधा-कृष्णाच्या वेशात नटलेले चिमुकले, शाळांमध्ये साजरी झालेली दहीहंडी, मंदिरामध्ये भाविकांनी केलेली गर्दी, मंदिरात आयोजित करण्यात आलेले विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम अशा वातावरणात शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. भाविकांनी सकाळपासूनच शहरातील कृष्ण मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरांमध्येही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इस्कॉन मंदिरात महामहोत्सव
रावेत येथील इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमीनिमित्त दोन दिवसीय महा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सुरू झालेल्या या महोत्सवात मंदिर व्यवस्थापनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त मंदिर पहाटे साडेचारपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. बुधवारी दिवसभरात पंचवीस हजार भक्तांनी मंदिरात दर्शन घेतल्याची माहिती मंदिरांचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांनी दिली. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा वाजता कृष्ण जन्मसोहळा झाला.

सामाजिक कार्यक्रमांची जोड
निगडीतील श्रीकृष्ण मंदिराला जन्माष्टमीनिमित्त फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. पहाटे मंदिरात कृष्णाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विष्णुसहस्रनाम जप करण्यात आला. रक्तदान शिबिराला आलेल्या भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. भक्तांच्या सोयीसाठी पहाटे पाचपासून रात्री उशिरापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. रात्री बारा वाजता कृष्णजन्मानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गीता आश्रम संस्थेत सोहळा
आध्यात्मिक साधकांचे श्रद्धास्थान असलेल्या खडकी येथील गीता आश्रम संस्थेने सालाबादप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा केला. जन्माष्टमीकरिता आश्रमाच्या परिसरात सजावट करण्यात आली होती. श्रीकृष्णाची अभिषेक व विविध उपचारांनी पूजा करण्यात आली. उपस्थित भाविकांनी विशेष प्रसादाचा लाभ घेतला. संस्थेच्या पिंपरीतील भाविकांनीही गुरुजींच्या पूजा, दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. संस्थेच्या यू ट्यूब चॅनेलवर ‘मन की पुकार सुन’ हे कान्हाच्या भक्तीने ओथंबलेले नवे भजन प्रकाशित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT