पिंपरी-चिंचवड

नोकरदार, विद्यार्थ्यांची जेवणासाठी वणवण

CD

‘बंद’मुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्वीट होम्स, डेअरी, खानावळी अशा व्यावसायिकांनीदेखील आपले व्यवसाय बंद ठेवून ‘बंद’मध्ये आपला सहभाग नोंदविला. शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात आलेले बहुतांश विद्यार्थी न्याहारीसह जेवणासाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनजीकच्या खानावळींवर अवलंबून असतात पण शहर ‘बंद’मुळे हॉटेल, खानावळी बंद ठेवण्‍यात आल्या होत्या. यामुळे शासकीय नोकरीनिमित्त शहरात एकटे राहणारे नोकरदार, विद्यार्थी, खासगी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या नागरिकांच्या जेवणाचे हाल झाले. शहरात कोठेच खाद्य पदार्थ मिळत नसल्याने या सर्वांवर बिस्कीट खाण्याची वेळ आली. चहासाठी अनेकांना वणवण करण्याची वेळ आली. नेहमी हॉटेलमध्ये जाणाऱ्या नागरिकांचे तसेच बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक ग्राहकांना हॉटेल बंदची माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये गर्दी झाली.

रुग्णालयातील नातेवाईकांचे हाल
‘बंद’मुळे खासगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, चहापाणी मिळणे अवघड झाले होते. शहरात संत तुकारानगर, निगडी, आकुर्डी, पिंपरी, नेहरूनगर, वाकड सारख्या अनेक ठिकाणी मोठे खासगी रुग्णालय असून, त्या ठिकाणी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईंकाना जेवण आणि चहापाण्यासाठी वनवण करण्याची वेळ आली. जमेची बाजू एवढीच की अनेक ठिकाणी फळांच्या गाड्या सुरू होत्या. त्या ठिकाणी फळे खाण्याची वेळ या सर्वांवर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT