पिंपरी-चिंचवड

चिंचवडमधील मंगलमूर्तीची उद्यापासून भाद्रपद यात्रा

CD

पिंपरी, ता. १४ ः चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त मंगलमूर्तीची भाद्रपद पालखी यात्रा येत्या शनिवारपासून (ता. १६) सुरू होत आहे. २५ सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
शनिवारी दुपारी बाराला पालखी मोरगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील ढोल पथकांचे वादन यावेळी सादर केले जाईल. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, चिंचवडगाव स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, (पिंपरी-चिंचवड लिंकरोड) मुंबई-पुणे महामार्ग या मार्गाने पालखी पुण्यात पोचेल. शनिवारी पालखीचा मुक्काम एकनाथ मंगल कार्यालय येथे असेल.
रविवारी (ता. १७) पहाटे साडेचारला पालखी मोरगावकडे मार्गस्थ होईल. हडपसर दिवेघाट मार्गे पालखी सासवड येथील कऱ्हाबाई मंदिरात पोचेल. सोमवारी सकाळी पालखी जेजुरीमार्गे मोरगाव येथे पोचेल. त्यानंतर दोन दिवस पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. गुरुवारी (ता. २१) पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल व सोमवारी (ता. २५) पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT