पिंपरी-चिंचवड

मानवतावादी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत देऊ ः कुलकर्णी

CD

पिंपरी, ता. २१ ः सामाजिक दायित्व असलेली माणसे विखुरलेल्या स्वरूपात का असेना समाजात आहेत, ती आता संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित, वंचितांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवत आहेत, समस्या निवारण करत आहेत. हे मानवतावादी महान कार्य आहे. आम्ही अशा संस्थांना मदतीचा हात देऊ, असे आश्वासन काशीधाम मंगल कार्यालयाचे संचालक व संस्थेचे सल्लागार अवधूत कुलकर्णी यांनी ‘वुई टूगेदर’ फाउंडेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले.

चिंचवड येथे झालेल्या मेळाव्याचे उद्‍घाटन अवधूत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना काळात वुई टूगेदर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या वतीने मावळ आदिवासी दुर्गम व गरीब वस्त्यांमध्ये सेवा सक्षमीकरण केंद्रे चालवली जातात. विधवा, एकल महिला, घरेलू महिलांसाठी आधार समुपदेशन, रोजगार माहिती विनिमय, कायदा साहाय्य मार्गदर्शन, जन आरोग्य वैद्यकीय सेवा, जीवरक्षक औषधे, जीवनावश्यक अन्नधान्य बँक, उच्च व परदेशी शिक्षण मार्गदर्शन विविध प्रकारची समूह सेवा केंद्रे शहरात संस्थेचे कार्यकर्ते चालवत आहेत.

संस्थेचा द्वितीय वार्षिक मेळावा नुकताच झाला. या वेळी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सलीम सय्यद, सचिवपदी शंकर कुलकर्णी, खजिनदारपदी दिलीप चक्रे यांची निवड करण्यात आली. तसेच डॉ. किशोर खिल्लारे, प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया, सीता ताई केंद्रे, मधुकर बच्चे, रोहन चव्हाण, अवधूत कुलकर्णी यांची सल्लागार समितीत निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर यांनी प्रास्ताविक केले. तर श्रीनिवास जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन भावीन भंडारी, योगेश गोंठे, मनीषा लाटकर, राजेंद्र महाले, रुकसाना काझी, शैलजा कडुलकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT