पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

वय वाढवून बोहल्यावर
चढलेल्या नवरदेवावर गुन्हा
पिंपरी : कागदपत्रांवर खाडाखोड करीत वय वाढवून लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ मे २०२३ रोजी आळंदीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नवरदेवासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेशने शाळेचा दाखला व आधार कार्डच्या झेरॉक्‍सवर जन्म तारखेत खाडाखोड करून स्वतःचे वय जास्त असल्याचे भासविले. त्यावरून हिंदू पद्धतीने आळंदी येथे तरुणीशी विवाह केला. मात्र, नवरदेवाचे वय कमी असल्याचे लक्षात येताच तरुणीच्या वडिलांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आळंदी पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत.

चऱ्होलीत महिलेची सव्वातीन लाखांची फसवणूक
दिघी : बेकरी सुरू करण्याच्या बहाण्याने एकाने महिलेची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चऱ्होली येथे २६ जून २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जिया उल अन्सारी (वय ३५, रा. पिंपरी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेतले. ‘केक अ लॉक’ या नावाने बेकरी सुरू करण्याचे आमिष दाखवले. बेकरी सुरू करण्यासाठी मशिन खरेदी करण्याबरोबरच इतर बाबींकरिता आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख व चेकद्वारे तीन लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर बेकरीचा करारनामा करतो, असे सांगितले. मात्र, अद्याप कोणताही करारनामा न करता आरोपीने परस्पर पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.


भोसरीतील कंपनीची पावणे दोन कोटींची फसवणूक
भोसरी : कोऱ्या धनादेशावर बनावट सह्या, कंपनीचा बनावट शिक्का मारुन पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दोन नोव्हेंबर २०२२ ते ४ मे २०२३ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला. याप्रकरणी एमयाडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अंकित प्रदिप जैन (वय ३८, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलकंठ मच्छिंद्र पाटोले (रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंपनीत कायदा सल्लागार म्हणून काम करतात. दरम्यान, आरोपीने कंपनीच्या धनादेशावर सही न घेता कंपनीचे बनावट लेझर बनवले. बनावट शिक्का तयार केला. खोट्या सह्या करीत कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी एक कोटी ८४ लाख ४४ हजार ५०० रुपये काढून घेतले. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

मुलीच्या विनयभंग; देहूरोडमध्ये तरुणाला अटक
देहूरोड : रात्रीच्या वेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग कऱणाऱ्या तरुणाला तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २६) रात्री देहूरोड येथे घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ताफ सय्यद (वय २१, रा. देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी घरात झोपले असताना आरोपीने घरात शिरून फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT