पिंपरी-चिंचवड

प्रतिभा महाविद्यालयातर्फे सायकल फेरीद्वारे प्रबोधन

CD

पिंपरी, ता.९ ः चिंचवड कमला शिक्षण संकुल प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी निगडी परिसरात सायकल फेरी काढून घोषणा देत जनजागृती केली. पर्यावरण दिनाचे निमित्त वृक्ष लागवड केली. विविध गृहसंकुलात व सार्वजनिक जागेतील प्लॅस्टिक, कचरा गोळा करून एकत्रित संकलन केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. आश्लेषा देवळे, प्रा. सुखलाल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सेवा योजनेचे विद्यार्थी अथर्व दिघे, श्वेता वर्मा, अनिकेत शिंदे, सृष्टी पवार, दिपू सिंग, पूजा संके, नीतेश चौधरी, वैष्णवी मिर्चे, अथर्व करिअप्पा यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सीबीएससी बोर्ड) मध्ये कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने संयुक्त कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन व पर्यावरण जागृतीविषयी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, कचरा व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन, पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे समर्पकपणे तज्ज्ञांनी दिली. प्राचार्या सविता ट्रॅव्हिस, उपप्राचार्या लिझा सोझू शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT