पिंपरी-चिंचवड

शालेय साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात

CD

पिंपरी, ता. १४ ः महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता शालेय साहित्य थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास मंगळवारी स्थायी समिती सभेने मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. दोन्ही सभांची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय मान्यतेसाठी होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
महापालिका नवीन थेरगाव, नवीन भोसरी आणि प्रभाकर कुटे आकुर्डी रुग्णालय येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील प्राप्त परवानगीच्या अनुषंगाने बँक गँरंटीची रक्कम भरणे; पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक कर्मचारी उपलब्ध करणे; महापालिकेच्या विविध विभागांचे लेखापरीक्षण करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षण विभागामध्ये कार्यरत सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सहा महिन्यांसाठी नियुक्ती देणे; पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे स्थापत्य विषयक सुशोभीकरणाची कामे, प्रभाग एकमधील रस्ते मजबुतीकरण करून डांबरीकरण करणे; भामा-आसखेड प्रकल्पाअंतर्गत तळवडे-चिखली येथील प्रकल्पास वीजपुरवठा करणे; पंपगृह चालन करणे, रावेत येथील पंपाचे रेट्रोफिटींग करणे, २०२३-२४ साठी तरतूद वर्गीकरण करणे, दुबार विकास हक्क प्रमाणपत्र अदा करण्यासाठी शुल्क लागू करणे आदी विषयांनाही मान्यता देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT