पिंपरी-चिंचवड

विश्व हिंदू परिषदेतर्फे वारीसाठी १० रुग्णवाहिका, २८ डॉक्टर्स

CD

पिंपरी, ता. १४ ः विश्व हिंदू परिषदेतर्फे वारकऱ्यांसाठी पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम गेल्या ३७ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यंदाच्या आरोग्यसेवेचा प्रारंभ मंगळवारी झाला. आरोग्य व वैद्यकीय पथकाच्या १० रुग्णवाहिका, २८ डॉक्टर्स, २४ परिचारिका आणि ८० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, अशी माहिती परिषदेचे प्रांतमंत्री प्रा. संजय मुद्राळे आणि सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांनी दिली.
संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावर आठ दिवसांपूर्वीच तीन रुग्णवाहिका देऊन आरोग्यसेवा सुरू केली आहे. पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तीन, संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन आणि डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी एक अशा रुग्णवाहिका दिल्या आहेत. पुणे महापालिका अन्न आणि औषध प्रशासन अतिरिक्त आयुक्त श्याम प्रतापवार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. ग्लोबल बायोटेक कंपनीचे प्रमुख गिरीश जैवाल, प्रांताध्यक्ष पांडुरंग राऊत, किशोर चव्हाण, मनोहर ओक, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, राजेश कोंढरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT