तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १६ : गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसीतून जाणाऱ्या दोन प्रमुख रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांना शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यासंदर्भात मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे शिष्टमंडळाचे प्रमुख रामदास काकडे यांनी सांगितले.
बैठकीत टप्पा क्र.१ ते टप्पा क्र. २ चाकण-तळेगाव रस्ता एमआयडीसी मार्गे जोडणे आणि टप्पा क्र. १ ते टप्पा क्र. ४ जनरल मोटर्स ते आंबळे एमआयडीसी रस्ता जोडणे या विषयावरील भूसंपादन आणि मोबदल्याबाबत चर्चा झाली. शासनाने शेतकऱ्यांनी प्रति एकरी एक कोटी चार लाख रुपये देवू केलेल्या दराऐवजी दोन कोटी रुपये द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काकडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास शेतकरी जमिनी त्वरित संपादनासाठी देण्यास तयार आहेत.
भूसंपादनासाठी प्रति एकरी दोन कोटी दर मिळावा, बाधितांना पाणी, वीज, ड्रेनेज या सारख्या मूलभूत सुविधा विना मोबदला पुरवाव्यात, एमआयडीसीने परतावा भूखंड वाटपावेळी कोणतेही विकास शुल्क आकारू नयेत, ४५ मीटर रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना तो रस्ता विनामोबदला वापरण्यास द्यावा, २००५ व २००८ च्या अधिसूचनेनुसार जोड रस्त्यासाठी संपादित केलेल्या व संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावरील भूसंपादन रद्द करण्यात यावे आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, प्रादेशिक अधिकारी सचिन बारावकर, प्रांत अधिकारी मावळ सुरेंद्र नवले आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख रामदास काकडे, संजय साने, राजेश म्हस्के, पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, देवदास पडवळ, सुभाष शेवकरी, श्रीधर बधाले, संभाजी शेवकरी, मुरलीधर शेवकरी, विठ्ठल कदम आदि उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.