सोमाटणे, ता. १६ ः उर्से पेट्रोल पंपाजवळ वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून वाहनचालकांनी रस्त्यालगत वाहने थांबवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
द्रुतगती मार्गावरील खंडाळा ते किवळे दरम्यान सर्वाधिक लूटमारीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या उर्से पेट्रोलपंपाजवळील लूटमारीचे प्रकार रोखण्यासाठी यापूर्वी महामार्ग पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत विशेष पोलिस पथकामार्फत चोरट्यांवर बारीक नजर ठेवून अनेकांना पकडण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांच्या भीतीने येथील लूटमारीचे प्रकार काही काळ थांबले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून लुटमारीचा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टेंपोचालक अल्लाउद्दीन गफूर पठाण (वय ४३, रा. सावळेघर, ता. मोहळ, सोलापूर) याने उर्से पेट्रोलपंपाजवळ टेंपो थांबवून तो लघुशंकेसाठी गेला असता अज्ञात चोरट्यांनी टेंपोमधील चाळीस हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. याबाबत त्यांनी शिरगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, लूटमारीचे प्रकार टाळण्यासाठी वाहनचालकांनी रात्रीच्यावेळी रस्त्यालगत वाहने थांबवू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.